मराठी बातम्या /बातम्या /मनी /

RBI Monetary Policy Committee Meet : सलग चौथ्यांदा महागला रेपो रेट, 0.50% वाढ, कर्ज महागले

RBI Monetary Policy Committee Meet : सलग चौथ्यांदा महागला रेपो रेट, 0.50% वाढ, कर्ज महागले

 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया Jobs

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया Jobs

RBI Monetary Policy Committee Meet : US फेड बँकेपाठोपाठ आता महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी RBI देखील व्याजदारत वाढ केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : US फेड बँकेपाठोपाठ आता महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी RBI देखील व्याजदारत वाढ केली आहे. आरबीआय मॉनेटरी पॉलिसी बैठकीत व्याजदराबाबत आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात आता सर्वसामान्य लोकांना आणखी एक फटका बसला आहे.

सलग चौथ्यांचा रेपो रेट वाढवण्यात आला आहे. ०.५० टक्क्यांनी वाढून 5.90 टक्क्यांवर व्याजदर पोहोचलं आहे. या वर्षात मध्यवर्ती बँकेने व्याजदरात केलेली ही चौथी वाढ आहे. याआधी ऑगस्टमध्ये रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली होती आणि व्याजदर 4.90 टक्क्यांवरून 5.40 टक्के करण्यात आले होते.

RBI ने रेपो रेटमध्ये 0.50 टाक्यांनी वाढ केली आहे. व्याज दरात वाढ झाल्यामुळे कर्जेदेखील महाग होणार आहे. त्यामुळे आता EMI भरताना ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे. याचा परिणाम शेअर मार्केटमध्ये बँकांच्या शेअर्सवर देखील पाहायला मिळू शकतो.

दोन मोठे धक्का जगभरात बसले आहेत. पहिला धक्का हा कोरोनाचा आहे. तर दुसरा धक्का रशिया युक्रेनचा आहे. ज्यामुळे महागाई खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Repo Rate आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये काय फरक? सोप्या भाषेत समजून घ्या गणित

शक्तीकांत दास काय म्हणाले?

- भारताचा GDP ग्रोथ आजही चांगला आहे

- US डॉलरचं मूल्य वाढल्यामुळे त्याचा मोठा परिणाम

- MPC मधील ६ पैकी ५ सदस्यांनी महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्याजदरात वाढ करण्याच्या बाजूनं मत दिलं

- आव्हानात्मक स्थितीमध्ये देखील भारताची आर्थिक स्थिती सुदृढ आहे

- सणासुदीमुळे मागणी वाढल्याचं पाहायला मिळालं

- सरकारी खर्च वाढल्याने लिक्विडिटीवर चांगला परिणाम

- पुरवठ्याच्या चिंतेमुळे महागाई दरात वाढ करण्यात आली

- FY23 मध्ये ७ टक्के GDP ग्रोथ होईल अशी अपेक्षा

- FY23 Q2 मध्ये GDP ग्रोथ ६.३ टक्के होईल अशी अपेक्षा

First published:

Tags: Money, Money matters, Rbi, Rbi latest news, Share market