मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Price Today: सोन्याचा भाव 47 हजारांच्या पार, चांदीची झळाळी मात्र उतरली

Gold Price Today: सोन्याचा भाव 47 हजारांच्या पार, चांदीची झळाळी मात्र उतरली

Gold Silver Price, 14 July 2021: सोन्याच्या किंमतीमध्ये बुधवारी तेजी पाहायला मिळाली आहे. दरम्यान आज चांदीचे दर (Silver Prices Today)उतरले आहेत. तज्ज्ञांच्या मते डॉलरमध्ये कमजोरी आल्यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर वधारले आहेत.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 14 जुलै: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वधारल्यामुळे देशांतर्गत बाजारातही 14 जुलै 2021 रोजी सोन्याच्या दरात वाढ (Gold Price Today) झाली आहे. आज सोन्याचे भाव किरकोळ वधारले आहेत मात्र चांदीचे दर (Silver Price Today) आजही उतरले आहेत. आधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात 47,001 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते तर चांदीचे दर 68,062 रुपये प्रति होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वधारले आहेत मात्र चांदीचे दर स्थिर आहेत.

सोन्याचे नवे दर (Gold Price, 14 July 2021)

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात किरकोळ 23 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये या वाढीनंतर 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर  47,024 रुपये प्रति तोळा झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढून 1,812 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत.

हे वाचा-Post Office बँकेत खातं असेल तर 1 ऑगस्टपासून होणार हा बदल,मोजावे लागतील अधिक पैसे

चांदीचे नवे दर (Silver Price, 14 July 2021)

चांदीच्या दरात आज घसरण झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात चांदीचे दर 399 रुपयांनी कमी होऊन 67,663 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही. त्यामुळे चांदीचे दर  26.02 डॉलर प्रति औंसवर आहेत.

हे वाचा-SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाचे, या LINK वर क्लिक करण्यापूर्वी सावधान!

का वधारले सोन्याचे दर?

एचडीएफसी सिक्‍योरिटीज (HDFC Securities) चे सीनियर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते डॉलरमधील कमजोरीमुळे आज सोन्याचे दर वाढले आहेत. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे वीपी कमोडिटी रिसर्च नवनीत दमानी यांच्या मते, अमेरिकेत महागाईच्या आकडेवारीच्या प्रतीक्षेत डॉलरमध्ये कमजोरी पाहायला मिळते आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत चढउतार पाहायला मिळतो आहे, ज्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीवर होत आहे.

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today