जाहिरात
मराठी बातम्या / मनी / रिझर्व्ह बँकेची तीन बँकांवर मोठी दंडात्मक कारवाई, तुमचंही 'या' बँकांमध्ये खातं आहे का?

रिझर्व्ह बँकेची तीन बँकांवर मोठी दंडात्मक कारवाई, तुमचंही 'या' बँकांमध्ये खातं आहे का?

RBI

RBI

रिझर्व्ह बँकेने द नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक (The Nashik Merchants’ Co-operative Bank), महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (Maharashtra State Cooperative Bank) या बँकांवर कारवाई केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 जुलै : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) तीन बँकांवर नियमांचं पालन न केल्याचा ठपका ठेवत कारवाई केली आहे. यात बँकांमध्ये द नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक (The Nashik Merchants’ Co-operative Bank), महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (Maharashtra State Cooperative Bank) यांचा समावेश आहे. बँकांकडून नियमांचे पालन न केल्यास रिझर्व्ह बँक दंड आकारत असते. या कारवाईचा बँकेच्या ग्राहकांवरही परिणाम होत असतो. रिझर्व्ह बँकेने या कारवाई संदर्भात एक निवेदन जारी केले आहे. यात RBIने म्हटलं की, मुंबईतील ‘महाराष्ट्र राज्य सहकारी बँके’ने फसवणूक आणि देखरेख संदर्भात जारी केलेल्या नाबार्ड निर्देशांचे पालन न केल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे बँकेला 37.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. झी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना झटका, बँकेचं MCLR वाढवल्याने कर्ज महाग होणार, EMI वाढणार रिझर्व्ह बँकेने द नाशिक मर्चंड को ऑपरेटिव्ह बँकेवरील कारवाईबाबत म्हटलं की, ‘द नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँके’ला इतर बँकांमधील ठेवींचे नियोजन आणि ठेव रकमेवरील व्याजाच्या बाबतीत आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बिहारमधील बेतिया येथे असलेल्या ‘नॅशनल सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’लाही दोन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दोन मोठ्या बँकांना प्रत्येकी एक कोटींचा दंड याआधी RBI ने कोटक महिंद्रा बँक आणि इंडसइंड बँकेला प्रत्येकी एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. ‘Know Your Customer’ (KYC) नियमांचे पालन न केल्यामुळे इंडसइंड बँकेला दंड ठोठावण्यात आला होता. नवीन IPOची वाट पाहणाऱ्यांसाठी गुंतवणुकीची संधी, तीन कंपन्यांच्या आयपीओला सेबीची मंजुरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील दावणगेरे येथील मिल्लथ को-ऑपरेटिव्ह बँक लि. दावणगेरेचा (Millath Co-operative Bank Ltd., Davangere) परवाना सस्पेंड केला होता. बँकेकडे पुरेसे भांडवल नाही आणि कमाईची क्षमता नाही, असं आरबीआयने म्हटलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात