जाहिरात
मराठी बातम्या / मनी / नवीन IPOची वाट पाहणाऱ्यांसाठी गुंतवणुकीची संधी, तीन कंपन्यांच्या आयपीओला सेबीची मंजुरी

नवीन IPOची वाट पाहणाऱ्यांसाठी गुंतवणुकीची संधी, तीन कंपन्यांच्या आयपीओला सेबीची मंजुरी

नवीन IPOची वाट पाहणाऱ्यांसाठी गुंतवणुकीची संधी, तीन कंपन्यांच्या आयपीओला सेबीची मंजुरी

ज्वेलरी रिटेलर सेन्को गोल्ड लि. (Senco Gold ltd.), इलेक्ट्रॉनिक सब-सिस्टम आणि केबल हार्नेस निर्माता डीसीएक्स सिस्टम्स (DCX Systems) आणि फ्रोझन मीट निर्यातक HMA अॅग्रो इंडस्ट्रीज (HMA Agro Industries) यांच्या IPO ला बाजार नियामक सेबीची मंजुरी मिळाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 जुलै : शेअर बाजारातील (Share Market Update) अस्थिर वातावरणात अनेक गुंतवणूकदारांचे मोठं नुकसान झालं आहे. मात्र शेअर बाजारात अशी चढ-उताराची स्थिती अपेक्षित असतेच, त्यामुळे गुंतवणूकदारही सावध भूमिका घेताना दिसतात. म्हणूनच अनेक गुंतवणूकदार वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या शोधात असतात. अशा गुंतवणूकदारांना नवीन आयपीओमध्ये गुंतवणुकीची संधी आहे. कारण सेबीनी तीन नवीन आयपीओंना ग्रीन सिग्नल दिला आहे. ज्वेलरी रिटेलर सेन्को गोल्ड लि. (Senco Gold ltd.), इलेक्ट्रॉनिक सब-सिस्टम आणि केबल हार्नेस निर्माता डीसीएक्स सिस्टम्स (DCX Systems) आणि फ्रोझन मीट निर्यातक HMA अॅग्रो इंडस्ट्रीज (HMA Agro Industries) यांच्या IPO ला बाजार नियामक सेबीची मंजुरी मिळाली आहे. या कंपन्यांनी मार्च ते एप्रिल दरम्यान सेबीकडे आपले कागदपत्र दाखल केले होते. फायनान्शियल एक्सप्रेसने याबाबतचं वृत्त दिलं आहे. या तिन्ही कंपन्यांना मिळून आयपीओद्वारे सुमारे 1,605 कोटी रुपये उभे करायचे आहेत. बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना झटका, बँकेचं MCLR वाढवल्याने कर्ज महाग होणार, EMI वाढणार Senco Gold IPO ड्राफ्ट पेपरनुसार, सेन्को गोल्ड आयपीओद्वारे 525 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. या अंतर्गत 325 कोटी रुपयांपर्यंतचे नवीन शेअर्स जारी केले जातील. तर ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत 200 कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्स विकले जातील. IPO अंतर्गत मिळणारी रक्कम वर्किंग कॅपिटल गरजांसाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरली जाईल. सेन्को गोल्डचे सध्या 127 शोरूम आहेत. यापैकी 70 कंपनी स्वतः चालवते, तर 57 फ्रँचायझींकडे आहेत. भारतातील 13 राज्यांमधील 89 शहरांमध्ये कंपनीचा विस्तार आहे. कंपनी वेगवेगळ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे उत्पादने विकते. कंपनी आपल्या दागिन्यांची घाऊक निर्यात देखील मुख्यतः दुबई, मलेशिया आणि सिंगापूर येथे करते. UPI द्वारे ATM मधून पैसे काढणे फ्री असेल की शुल्क आकारलं जाईल? रिझर्व्ह बँकेने केलं स्पष्ट DCX Systems IPO ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार, DCX Systems 600 कोटी रुपयांचा IPO लॉन्च करेल. या अंतर्गत 500 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. तर 100 कोटी रुपयांपर्यंतचे शेअर OFS अंतर्गत विकले जातील. कंपनीच्या IPO मधून मिळणारे पैसे कर्ज फेडण्यासाठी, खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्याच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनी, Ranial Advanced Systems मध्ये गुंतवणूक करण्यासाठी वापरले जातील. बंगलोर स्थित कंपनी प्रामुख्याने सिस्टीम इंटिग्रेशन आणि केबल्स आणि वायर हार्नेस असेंब्लीची काम करते. HMA Agro Industries IPO फ्रोझन मीट एक्सपोर्ट कंपनी एचएमए अॅग्रो इंडस्ट्रीजला आयपीओद्वारे 480 कोटी रुपये उभे करायचे आहेत. या IPO अंतर्गत, 150 कोटी रुपयांपर्यंतचे नवीन शेअर्स जारी केले जातील. त्याच वेळी, कंपनीच्या प्रमोटर्सकडून ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत 330 कोटी रुपयांपर्यंतचे शेअर विकले जातील. कंपनी 135 कोटी रुपयांच्या निव्वळ उत्पन्नाचा वापर खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी करेल. यासोबतच हा निधी कॉर्पोरेट कामांसाठीही वापरला जाईल. ही आग्रा बेस्ड फर्म भारतातील फ्रोजन बफेलो मीट उत्पादनांच्या सर्वात मोठ्या निर्यातदारांपैकी एक आहे. त्याचे उत्पादने जगभरातील 40 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात केले जातात. त्याची 90 टक्के विक्री निर्यातीतून होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात