मुंबई, 12 जुलै : एकीकडे महागाईने (Inflation) नागरिक त्रस्त आहेत. दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूचे दर वाढताना दिसत आहेत. अशात रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये (RBI Repo Rate) वाढ केल्यानंतर बँकाने आपले कर्जाचे दरही वाढण्यास सुरुवात केली. याचा थेट फटका नवीन कर्ज घेणाऱ्या किंवा कर्ज घेतलेल्या ग्राहकांना बसला. आता सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) पुन्हा एकदा कर्ज महाग केले आहे. बँक ऑफ बडोदाने MCLR (Marginal Cost Of Lending Rates) मध्ये वाढ केली आहे. बँकेने आपल्या एमएलसीआरमध्ये 10 ते 15 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. बँक ऑफ बडोदाच्या या निर्णयामुळे गृहकर्जासह इतर कर्जे घेणे महाग होणार आहे. त्याच वेळी, ज्या ग्राहकांनी आधीच गृहकर्ज घेतले आहे त्यांचा ईएमआय अधिक महाग होईल. आजपासून म्हणजेच 12 जुलैपासून एका वर्षाच्या कालावधीत MCLR 7.50 टक्क्यांवरून 7.65 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्याच वेळी, 6 महिन्यांच्या कालावधीसाठी MCLR 7.35 टक्क्यांवरून 7.45 टक्के झाला आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत MCLR 7.25 टक्क्यांवरून 7.35 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. एक महिना आणि ओव्हरनाईट MCLR मध्ये कोणताही बदल नाही. UPI द्वारे ATM मधून पैसे काढणे फ्री असेल की शुल्क आकारलं जाईल? रिझर्व्ह बँकेने केलं स्पष्ट बँक ऑफ बडोदाचा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट 7.45 टक्के आहे. नॉन स्टाफ मेंबरसाठी गृहकर्जाचा दर 7.45 टक्के ते 8.80 टक्के आहे. तर स्टाफ मेंबर्ससाठी गृहकर्जाचा दर 7.45 टक्के आहे. बँक ऑफ बडोदाचे कार कर्ज सध्या 7.70 टक्के ते 10.95 टक्के आहे. Free Silai Machine Scheme: सरकार मोफत देत आहे शिलाई मशीन, आजच करा अर्ज इतर अनेक बँकांनीही MCLR वाढवला RBI ने रेपो रेट वाढवल्यानंतर अनेक बँकांनी MCLR वाढवून ग्राहकांना कर्ज घेणे महाग केले आहे. कॅनरा बँकेपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, युनियन बँक ऑफ इंडिया अॅक्सिस बँक यासह इतर अनेक बँकांनी त्यांचा MCLR वाढवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.