मुंबई, 30 मे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 4 बँकांना दंड ठोठावला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 3 बँकांचा समावेश आहे. शुक्रवारी आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार सिटीबँक 4 कोटी, भारत को-ऑपरेटिव्ह बँक 60 लाख, टीजेएसबी सहकारी बँक 45 लाख तर नगर-अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक 40 लाख - असा एकूण 5.45 कोटींचा दंड (monetary penalty) आकारण्यात आला आहे. मुंबईतील असणाऱ्या भारत को-ऑपरेटिव्ह बँकेवर 60 लाखाचा दंड आकारण्यात आला असून, RBI ने असे म्हटले आहे की या बँकेने उत्पन्न मान्यता, मालमत्ता वर्गीकरण मानदंड आणि फ्रॉड यासंदर्भातील आरबीआयने जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे. (हे वाचा- डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा, अमेरिकेचे WHO बरोबरचे संबंध संपुष्टात )
Reserve Bank of India has imposed, a monetary penalty of Rs 60 lakh on Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd for non-compliance with directions issued by RBI on Income Recognition and Asset Classification norms and Frauds
— ANI (@ANI) May 29, 2020
त्याचप्रमाणे RBI ने सिटीबँक (Citibank N.A.) वर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सर्वात जास्त म्हणजे 4 कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. आरबीआयने अशी माहिती दिली की, बँकिंग रेग्यूलेशन अॅक्ट (Banking Regulation Act, 1949) अंतर्गत क्रेडिट सुविधा घेणाऱ्या ग्राहकांकडून डिक्लेरेशन न प्राप्त करणे, नॉन फंड फॅसिलिटीच्या सुविधेचे पालन न करणे या कारणांमुळे दंड आकारला आहे. (हे वाचा- ड्रोनद्वारे केली जाणार औषधांची घरपोच डिलिव्हरी, स्पाइसजेट सुरू करतंय ही खास सेवा) ठाण्यातील असणाऱ्या ठाणे जनता सहकारी बँक (TJSB) या बँकेवर उत्पन्न मान्यता आणि मालमत्ता वर्गीकरण मानदंड याकरता असणाऱ्या नियमावलीचे पालन न केल्यामुळे 45 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. याच नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आरबीआयने अहमदनग स्थित नगर-अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर 40 लाखाचा दंड ठोठावला आहे. याआधी झाली होती दोन मोठ्या बँकांवर कार्यवाही गुरूवारी आरबीआयने बँक ऑफ इंडिया (Bank of India) वर NPA संबधित निर्देश पूर्ण न केल्याने 5 कोटींचा दंड आकारला होता. याच कारणासाठी कर्नाटक बँकेवर देखील 1.2 कोटींचा दंड आकारण्यात आला होता. आरबीआयच्या या कारवाईमुळे ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही आहे. काही नियमांचे पालन न केल्यामुळे आरबीआयकडून बँकांना नोटीस पाठवण्यात आली आहे