मराठी बातम्या /बातम्या /मनी /बँकांच्या वसुली एंजट्सना लगाम लागणार; RBI गर्व्हनर शक्तीकांत दास यांची कठोर भूमिका

बँकांच्या वसुली एंजट्सना लगाम लागणार; RBI गर्व्हनर शक्तीकांत दास यांची कठोर भूमिका

बँकांनी पुरेशी मार्गदर्शक तत्त्वे पाळली पाहिजेत आणि एजंट्सकडून आलेल्या फोन कॉल्सबाबतही मार्गदर्शक तत्त्वे दिली पाहिजेत, असं RBI गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी म्हटलं आहे.

बँकांनी पुरेशी मार्गदर्शक तत्त्वे पाळली पाहिजेत आणि एजंट्सकडून आलेल्या फोन कॉल्सबाबतही मार्गदर्शक तत्त्वे दिली पाहिजेत, असं RBI गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी म्हटलं आहे.

बँकांनी पुरेशी मार्गदर्शक तत्त्वे पाळली पाहिजेत आणि एजंट्सकडून आलेल्या फोन कॉल्सबाबतही मार्गदर्शक तत्त्वे दिली पाहिजेत, असं RBI गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी म्हटलं आहे.

मुंबई, 17 जून : बँकांचे कर्जाचे EMI थकले की बँकांचे एजंट ग्राहकांना कसे त्रास देतात अनेकदा समोर आलं आहे. अशावेळी ग्राहकांच्या बाजूने कुणीतरी असावं अशी एक मागणी होती. मात्र आता बँक एजंट यापुढे कर्ज वसुलीसाठी ग्राहकांना त्रास देऊ शकणार नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास (Governor Shaktikanta Das) यांनी शुक्रवारी याबाबत चिंता व्यक्त करत कठोर भूमिका घेतली. बँकांच्या एजंटांकडून ग्राहकांना होणारा त्रास खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांनी म्हटलं.

गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कर्जाच्या वसुलीसाठी एजंटांकडून (Loan Recovery Agents) ग्राहकाला वेळोवेळी कॉल करणे, वाईट भाषेत बोलणे इत्यादींसह इतर कठोर पद्धतींचा वापर करणे अजिबात मान्य केले जाणार नाही. कर्जवसुली करण्याचा अधिकार बँकांना आहे, पण त्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये. बँकांनी पुरेशी मार्गदर्शक तत्त्वे पाळली पाहिजेत आणि एजंट्सकडून आलेल्या फोन कॉल्सबाबतही मार्गदर्शक तत्त्वे दिली पाहिजेत.

PNB च्या 18 कोटी ग्राहकांना फटका; बँकेकडून 'ही' सुविधा तात्काळ बंद करण्याचा निर्णय

डिजिटल कर्ज वितरणाची प्रक्रिया अधिक सुरक्षित करेल

गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, डिजिटल कर्ज प्रणाली सुरक्षित आणि मजबूत करण्यासाठी रिझर्व्ह बँक लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल. डिजिटल प्लॅटफॉर्मवर कर्ज वाटपाच्या नावाखाली लोकांची कशी फसवणूक केली जाते, याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. मात्र लोकांना याविषयी जागरूक करण्यासाठी आरबीआय वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी करते.

स्टेट बँक ऑफ इंडियाचं Home Loan महागलं, आता किती जास्त EMI भरावा लागणार?

महागाई सहन करणे ही काळाची गरज

शक्तीकांत दास यांनी वाढत्या महागाईवरही भाष्य केले. ते म्हणाले की, केवळ भारतातच नव्हे तर अमेरिका-युरोपसह जगभरातील देशांमध्ये महागाईचा ताण आहे. ती अचानक थांबवणे कुणाच्याही हाती नाही, त्या दृष्टीने वाढलेली महागाई सहन करणे ही काळाची गरज आहे. आत्तापर्यंत घेतलेली पावले आणि याबाबतचे आमचे निर्णय यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. ते म्हणाले की, महामारीचा सामना करण्यासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलण्यात आरबीआय मागे राहिलेली नाही. काळाची गरज लक्षात घेऊन आपण चालत आहोत.

First published:
top videos

    Tags: Loan, Shaktikanta das