जाहिरात
मराठी बातम्या / मनी / स्टेट बँक ऑफ इंडियाचं Home Loan महागलं, आता किती जास्त EMI भरावा लागणार?

स्टेट बँक ऑफ इंडियाचं Home Loan महागलं, आता किती जास्त EMI भरावा लागणार?

स्टेट बँक ऑफ इंडियाचं Home Loan महागलं, आता किती जास्त EMI भरावा लागणार?

SBI ने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 0.20 टक्क्यांनी वाढ केली आहे. बँकेचा एक वर्षाचा MCLR आता 7.40 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो यापूर्वी 7.20 टक्के होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 जून : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने गेल्या आठवड्यात रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केल्यामुळे, अनेक बँकांनी त्यांच्या गृहकर्जाचे व्याजदर (Home Loan Interest Rate) आणि FD दर वाढवले ​​आहेत. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयचाही (State Bank Of India) या यादीत समावेश आहे. बँकेने गृहकर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. बँक आता आपल्या ग्राहकांना किमान 7.55 टक्के दराने गृहकर्ज देईल. SBI ने नुकत्याच केलेल्या वाढीचा अर्थ असा आहे की नियमित गृहकर्ज 800 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असलेल्यांना किमान 7.55 टक्के व्याजदराने गृहकर्ज मिळेल. इकोनॉमिक्स टाईम्सने याबाबत वृत्त प्रसारित केलं आहे. बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, SBI ने एक्टरनल बेंचमार्क बेस लेंडिंग रेट (External Benchmark-based lending rate -EBLR) 7.05 टक्क्यांवरून 7.55 टक्के केला आहे. मात्र क्रेडिट स्कोअर कमी असल्यास कर्जदारांना जास्त व्याज द्यावे लागेल. PNB च्या 18 कोटी ग्राहकांना फटका; बँकेकडून ‘ही’ सुविधा तात्काळ बंद करण्याचा निर्णय 750-799 क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना बँक 7.65 टक्के दराने कर्ज मिळेल. या कर्जदारांना 800 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असलेल्यांपेक्षा 0.10 टक्के महाग गृहकर्ज मिळेल. महिला कर्जदारांना व्याजदरात 0.05 टक्के सूट मिळेल. MCLR देखील वाढला SBI ने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 0.20 टक्क्यांनी वाढ केली आहे. बँकेचा एक वर्षाचा MCLR आता 7.40 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो यापूर्वी 7.20 टक्के होता. ऑटो लोन, होम लोन, पर्सनल लोन यांसारखी बहुतांश रिटेल कर्जे MCLR शी जोडलेली आहेत. Elon Musk यांच्या अडचणीत वाढ; क्रिप्टोकरन्सीबाबत 20 लाख कोटींचा खटला दाखल तुमचा EMI किती वाढेल? जर एखाद्या व्यक्तीने 7.05 टक्के दराने 20 वर्षांसाठी 35 लाख रुपयांचे कर्ज घेतले असेल तर त्याला 27,241 रुपयांचा EMI भरावा लागेल. आता त्याच व्यक्तीने 7.55 टक्के दराने 20 वर्षांसाठी 35 लाख रुपयांचे कर्ज घेतले तर त्याला 28,303 रुपयांचा EMI भरावा लागेल. अशा प्रकारे त्याला दरमहा 1,062 रुपये अधिक द्यावे लागतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Home Loan , money , SBI
  • First Published :
जाहिरात
जाहिरात