मुंबई, 17 जून : पंजाब नॅशनल बँकेत (PNB Account) तुमचे खाते असल्यास, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जर तुम्ही पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी पंपावर डिजिटल मोडमध्ये (Digital mode Payment) पैसे भरले तर यापुढे तुम्ही निराशा व्हाल. पेट्रोल-पंपांवर इंधनसाठी पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्यांनी डिजिटल पेमेंटवर दिलेली 0.75 टक्के सूट मागे घेण्यात आली आहे. झी न्यूजने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.
बँकेकडून ग्राहकांना लाभ देणे बंद
जे अनेकदा पेट्रोल डिझेल घेण्यासाठी कार्डद्वारे पैसे देतात त्यांना हा फटका बसणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने (PNB) हा लाभ ग्राहकांना ट्रान्सफर करणे थांबवले आहे. याचा परिणाम PNB च्या सर्व 18 कोटी ग्राहकांवर होणार आहे. मे महिन्यापासून पीएनबीने ग्राहकांना या सवलतीचा लाभ देणे बंद केले आहे.
Elon Musk यांच्या अडचणीत वाढ; क्रिप्टोकरन्सीबाबत 20 लाख कोटींचा खटला दाखल
पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) ही सुविधा मागे घेतल्याचे बँकेने म्हटले आहे. PNB वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) ने माहिती दिली आहे की तेल कंपन्यांनी (IOC, BPCL, HPCL) पेट्रोल पंपांवर डिजिटल मोडद्वारे इंधन खरेदीच्या पेमेंटवर 0.75 टक्के सवलत मागे घेतली आहे. पीएनबीकडून सांगण्यात आले की, मे महिन्यापासून ग्राहकांनी या सवलतीचा लाभ देणे बंद केले आहे.
Sovereign Gold Bond: पुन्हा एकदा स्वस्त सोनं खरेदीची संधी, कशी कराल गुंतवणूक?
NEFT, RTGSचे शुल्कही वाढले
यापूर्वी, NEFT, RTGS शुल्क देखील PNB ने वाढवले होते. बँकेने केलेला हा बदल 20 मे 2022 पासून लागू झाला आहे. PNB नुसार, ऑफलाइन व्यवहारांसाठी RTGS शुल्क 24.50 रुपये आणि ऑनलाइन व्यवहारांसाठी 24 रुपये करण्यात आले आहे, पूर्वी शाखा स्तरावर ऑफलाइन व्यवहारांसाठी RTGS साठी 20 रुपये होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Petrol and diesel, Pnb bank