मराठी बातम्या /बातम्या /मनी /Cryptocurrency मध्ये डील करताना सावधान! डिजिटल करन्सीबाबत RBI ने व्यक्त केली चिंता

Cryptocurrency मध्ये डील करताना सावधान! डिजिटल करन्सीबाबत RBI ने व्यक्त केली चिंता

भारतातील क्रिप्टोकरन्सीच्या कायदेशीर मान्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत रिझर्व्ह बँकेने (RBI on investment in Cryptocurrency) पुन्हा एकदा क्रिप्टोकरन्सीबाबत इशारा दिला आहे.

भारतातील क्रिप्टोकरन्सीच्या कायदेशीर मान्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत रिझर्व्ह बँकेने (RBI on investment in Cryptocurrency) पुन्हा एकदा क्रिप्टोकरन्सीबाबत इशारा दिला आहे.

भारतातील क्रिप्टोकरन्सीच्या कायदेशीर मान्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत रिझर्व्ह बँकेने (RBI on investment in Cryptocurrency) पुन्हा एकदा क्रिप्टोकरन्सीबाबत इशारा दिला आहे.

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर: शेअर मार्केट किंवा इतर पारंपरिक गुंतवणुकींच्या पर्यायांप्रमाणे अलीकडे डिजिटल करन्सीमध्येही गुंतवणूक वाढली आहे. क्रिप्टोकरन्सीवर मोठेमोठे व्यवहार केले जात आहेत, अनेकांनी यात पैसे गुंतवले आहेत. मात्र ही गुंतवणूक किती सुरक्षित किंवा किती धोकादायक आहे? क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार (Investment in Cryptocurrency) करणाऱ्या लोकांसाठी ही बातमी महत्त्वाची पण तितकीच धक्कादायक ठरू शकते. भारतातील क्रिप्टोकरन्सीच्या कायदेशीर मान्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत रिझर्व्ह बँकेने (RBI on investment in Cryptocurrency) पुन्हा एकदा क्रिप्टोकरन्सीबाबत इशारा दिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das) यांनी म्हटले आहे की, क्रिप्टोकरन्सी आरबीआयसाठी गंभीर चिंता निर्माण करू शकते. दास म्हणाले की, नियामक म्हणून क्रिप्टोकरन्सीबाबत आरबीआयसमोर अनेक आव्हाने आहेत.

RBI गव्हर्नर यांनी क्रिप्टोकरन्सी मायक्रोइकॉनॉमिक समतोल आणि आर्थिक स्थिरतेसाठी गंभीर धोका असल्याचे म्हटले आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढवून सांगितली जात आहे. असे अनेक गुंतवणूकदार आहेत ज्यांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये फक्त 1,000 किंवा 2,000 रुपये गुंतवले आहेत.

हे वाचा-सोन्याचांदीच्या दरात मोठा बदल! रेकॉर्ड स्तरापासून ₹1000नी स्वस्त मिळतंय सोनं

आरबीआय गव्हर्नर यांनी बीएफएसआय समिटमध्ये याबाबत माहिती दिली. त्यांनी असे म्हटले की, आरबीआयने क्रिप्टोकरन्सीवरील तपशीलवार अहवाल सरकारला सादर केला आहे. सरकार क्रिप्टोकरन्सींवर अधिकाधिक विचार करत आहे.

याआधी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले होते की, बाजारात ज्या प्रकारे क्रिप्टोकरन्सीचा व्यवहार होत आहे त्याबद्दल आरबीआय चिंतेत आहे. RBI चे डिजिटल चलन आणि क्रिप्टोकरन्सी हे दोन्ही पूर्णपणे वेगळे आहेत. सरकार आणि RBI दोघेही आर्थिक स्थैर्यासाठी कटिबद्ध आहेत. आम्ही सरकारला क्रिप्टोकरन्सीशी संबंधित सर्व चिंतांची माहिती दिली आहे. अशाप्रकारे देशातील केंद्रीय बँकेने क्रिप्टोकरन्सीबाबत चिंता व्यक्त केल्याने यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे.

हे वाचा-सोन्यात गुंतवणूक करताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या 6 गोष्टी, मिळेल योग्य फायदा

शक्तिकांत दास म्हणाले की, आरबीआय चलनाच्या डिजिटल आवृत्तीवर काम करत आहे. सध्या याचा अभ्यास केला जात आहे की डिजिटल चलन बाजारात आल्यास आर्थिक स्थिरतेवर काय परिणाम होईल. क्रिप्टोकरन्सीच्या किमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार होतात. या क्रिप्टोकरन्सी विदेशी मालमत्ता समजल्या जाव्यात, असा आवाज उठवला जात आहे. त्यांना पूर्णपणे परवानगी द्यायची की यावर सरकार निर्णय घेऊ शकते.

First published:
top videos

    Tags: Cryptocurrency, Rbi, Rbi latest news, Shaktikanta das