मराठी बातम्या /बातम्या /मनी /

अर्थव्यवस्था पुन्हा एकदा रुळावर येत आहे, RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा दावा

अर्थव्यवस्था पुन्हा एकदा रुळावर येत आहे, RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा दावा

कोरोनामुळे (Coronavirus) विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर रुळावर येत असल्याचे आरबीआयने (RBI) म्हटले आहे

कोरोनामुळे (Coronavirus) विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर रुळावर येत असल्याचे आरबीआयने (RBI) म्हटले आहे

कोरोनामुळे (Coronavirus) विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर रुळावर येत असल्याचे आरबीआयने (RBI) म्हटले आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर: कोरोना संकटामुळे (Coronavirus) जगभरातील अर्थव्यवस्थांना फटका बसला आहे. जगभरातील अनेक अर्थव्यवस्था या संकटाशी सामना करत आहेत. मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांबरोबरच भारताची देखील अर्थव्यवस्था डळमळलीत झाली आहे. पण सध्या देशाची अर्थव्यवस्था रुळावर येताना दिसून येत आहे. बाजारात मागणी देखील हळूहळू वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात भारतात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली होती. या काळात बेरोजगारीमध्ये 23 टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. सरकारने अनलॉकची (Unlock) प्रक्रिया सुरू केल्यापासून बेरोजगारीच्या टक्केवारीमध्ये घट झाली असून ती 6 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी देखील आता अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे म्हटलं आहे.

आरबीआयच्या धोरणांमुळे देश उभारी घेत आहे

देश आर्थिक रिव्हायव्हलवर आला असून त्यामुळे आर्थिक संस्थांकडे अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी पर्यायी प्रमाणात पैसे असणं गरजेचं असल्याचं देखील यावेळी शक्तिकांत दास यांनी म्हटलंय. वित्त आयोगाचे चेअरमन  एन. के. सिंह यांच्या 'पोट्रेट्स ऑफ पॉवर : हाफ अ सेंचुरी ऑफ बिंग ऍट रिंगसाइड' या पुस्तकांचं अनावरण करण्यात आलं या वेळी बोलताना शक्तिकांत दास यांनी मोठ्या प्रमाणात निधी जमा करण्यात आला असून अजून रक्कम जमा करण्याचं काम सुरू असल्याचं देखील यावेळी सांगितलं. याचबरोबर केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या सकारात्मक आणि धोरणात्मक नीतींमुळे देशभरातील आर्थिक परिस्थिती सुधारत आहे, असं ते म्हणाले.

कोरोनानंतर मजबूत योजना आवश्यक

कोरोनाच्या संकटानंतर देशभरामध्ये अर्थव्यवस्था मजबूत करणे गरजेचं आहे. त्याचबरोबर सरकारने यासाठी विशेष योजना देखील तयार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता आर्थिक आणि वित्तीय धोरणांमध्ये उदार दृष्टिकोन स्वीकारला गेला असल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

First published:

Tags: Rbi, Shaktikanta das