मराठी बातम्या /बातम्या /मनी /आगामी तिमाहीमध्ये GDP पॉझिटिव्ह असेल, RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली आशा

आगामी तिमाहीमध्ये GDP पॉझिटिव्ह असेल, RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली आशा

गेल्या दोन तिमाहींमध्ये भारताच्या जीडीपीमध्ये (GDP) घसरण झाल्याने चिंतेचे वातावरण  निर्माण झाले आहे परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली आहे.

गेल्या दोन तिमाहींमध्ये भारताच्या जीडीपीमध्ये (GDP) घसरण झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली आहे.

गेल्या दोन तिमाहींमध्ये भारताच्या जीडीपीमध्ये (GDP) घसरण झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली आहे.

नवी दिल्ली, 04 डिसेंबर: गेल्या दोन तिमाहींमध्ये भारताच्या जीडीपीमध्ये (GDP) घसरण झाल्याने चिंतेचे वातावरण  निर्माण झाले आहे परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसंच पुढील तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी सुधारणार असल्याचेही त्यांनी हटले आहे. भारताचा निगेटिव्ह जीडीपी पुन्हा पॉझिटिव्ह होण्याची अपेक्षा दास यांनी व्यक्त केली आहे. पुढील तिमाहीमध्ये जीडीपी ग्रोथ 0.10 टक्के राहणार असल्याचा अंदाज आरबीआयने बांधला आहे. यामध्ये त्यांनी चौथ्या तिमाहीमध्ये म्हणजेच जानेवारी ते मार्च या तिमाहीमध्ये जीडीपी ग्रोथ 0.70 टक्क्यापर्यंत जाणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. मात्र संपूर्ण वर्षाचा जीडीपी हा -7.5  टक्के राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारत सरकारने दिलेल्या दिलासा पॅकेजमुळे जीडीपी आणि आर्थिक घडामोडींमध्ये बदल होणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

GDP ग्रोथ मार्चच्या तिमाहीमधे पॉझिटिव्ह होणार

देशातील आघाडीची ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी गुरुवारी जाहीर केलेल्या इकोस्कोप अहवालात जीडीपी वाढण्यासंबंधी माहिती दिली आहे. ब्रोकरेज फर्मने यामध्ये म्हटले देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चिंता आहे. परंतु आर्थिक उलाढालींमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. मार्चच्या तिमाहीत जीडीपीत सकारात्मक वाढ होईल.

पुढील वर्षी भारताच्या जीडीपीत मोठी वाढ

भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठेत पुढच्या वर्षी आर्थिक वाढीचा वेग खूप वेगवान असणार आहे. मॉर्गन स्टॅनले यांनी आपल्या संशोधन अहवालात इमर्जिंग मार्केट्सची (Emerging Markets) जीडीपीची सरासरी वाढ (GDP Growth) 7.4 टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

(हे वाचा-व्याजदरात कोणताही बदल नाही, सामान्यांना स्वस्त EMIसाठी वाट पाहावी लागणार)

दिग्गज अमेरिकन फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी स्टॅनलेच्या रिपोर्टनुसार, 2021 मध्ये या बाजारांच्या आर्थिक वाढीस पाच फॅक्टर्स कारणीभूत ठरणार आहेत. पहिला फॅक्टर म्हणजे भारतातील मोठ्या बाजारात पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता कमी आहे. जानेवारी 2021 मध्ये कोरोना लस नागरिकांपर्यंत आल्यास यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विकसित देशांमध्ये (Developed Markets) विदेशी वस्तू आणि सेवांची मागणी वाढल्याने आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात होणार आहे.

आरबीआय गव्हर्नर म्हणाले...

ऑगस्टमध्ये, इमर्जिंग मार्केट्सचे मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय पुन्हा एकदा विस्तारणाऱ्या मोडमध्ये 50 च्या वर गेले. पुढच्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये त्यांचा इंडस्ट्रियल प्रॉडक्शन रेट पॉझिटिव्ह झाला आणि ऑक्टोबरमध्ये सर्व्हिसेस पीएमआय (Services PMI)  विकसित बाजारांच्या पातळीवर पोहोचले. त्यामुळे या सगळ्याचा फायदा आगामी काळात जीडीपी वाढण्यास होणार आहे.

First published:
top videos

    Tags: Gdp, Money, Rbi, Shaktikanta das