जाहिरात
मराठी बातम्या / मनी / अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्यास RBI पूर्णपणे तयार- शक्तिकांत दास

अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्यास RBI पूर्णपणे तयार- शक्तिकांत दास

अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्यास RBI पूर्णपणे तयार- शक्तिकांत दास

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das) यांनी बुधवारी अशी माहिती दिली की, अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी जी आवश्यक पावलं उचलावी लागतील त्याकरता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI Reserve Bank of India) पूर्णपणे तयार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी म्हटले आहे की कोरोनाच्या संकटकाळात (Coronavirus) अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी जी काही पावलं उचलण्याची गरज आहे. , रिझर्व्ह बँक त्यासाठी पूर्णपणे तयार आहे. उद्योग संघटना फिक्कीच्या (FICCI) एका कार्यक्रमात संबोधित करताना ते म्हणाले की, अर्थव्यवस्थेतील प्रगती अद्याप पूर्णपणे वेगवान झालेली नाही, मात्र त्यामध्ये हळूहळू प्रगती होईल.  त्यांनी खासगी क्षेत्राला अर्थव्यवस्थेच्या प्रगतीची गती वाढविण्यासाठी योगदान देण्यास सांगितले. दास म्हणाले की कोविडमुळे ताण पडलेल्या मालमत्तेचे वन-टाइम पुनर्रचना किंवा रिझोल्यूशन योजना ही कोरोनाव्हायरसमुळे त्रस्त असलेल्या व्यवसायांना मदत करण्यासाठी आहे. आरबीआयने सहा महिन्यासाठी जाहीर केलेला कर्जावरील मोरटोरियम यासारख्या योजनांबद्दल दास यांनी भाष्य केले. (हे वाचा- आर्थिक मंदीच्या संकटात देखील टाटा समुह देणार 235 कोटींचा बोनस ) आरबीआय गव्हर्नर म्हणाले, आरबीआयच्या मोठ्या प्रमाणात लिक्विडिटी इन्फ्युजनमुळे सरकारला कमी दराने मोठ्या प्रमाणात कर्ज घेणे सुनिश्चित केले आहे. दास म्हणाले की, केंद्रीय बँकेने लिक्विडीटीची परिस्थिती कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आणि देशभरात पसरलेल्या कोरोनाच्या परिस्थितीत आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत परिणाम झालेल्या व्यवसायांना निधी उपलब्ध करून दिला. (हे वाचा- PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी, खात्यातून पैसे काढण्यासाठी या चुका टाळा) शैक्षणिक क्षेत्राविषयी बोलताना शक्तिकांत दास म्हणाले की हे क्षेत्र आर्थिक विकासाला हातभार लावित आहे. तसंच नवीन शिक्षण धोरण ऐतिहासिक आहे, मात्र नव्या युग सुधारणांची देखील यात आवश्यकता आहे. कोव्हिड-19 नंतर अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर यांनी खासगी क्षेत्राला संशोधन, अन्न प्रक्रिया आणि पर्यटन क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावण्यास सांगितले आहे. ते म्हणाले आहेत की पर्यटन क्षेत्रात खूप व्यापक शक्यता आहेत आणि त्याचा फायदा खासगी क्षेत्राने घ्यावा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात