Home /News /money /

आर्थिक मंदीच्या संकटात देखील टाटा समुह देणार 235 कोटींचा बोनस, वाचा किती मिळेल रक्कम

आर्थिक मंदीच्या संकटात देखील टाटा समुह देणार 235 कोटींचा बोनस, वाचा किती मिळेल रक्कम

टाटा समुहाने (Tata Group) ने यावर्षी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये अधिक रक्कम पोहचणार आहे. बोनसची रक्कम याआधी निश्चित केलेल्या फॉर्मूल्यानुसार दिली जाणार आहे.

    जमशेदपूर, 16 सप्टेंबर : कोरोनाच्या (Coronavirus) संकटकाळात अनेकांनी नोकऱ्या गमावल्या. काहींना सक्तीच्या रजेने घरी बसवण्यात आले तर काहींनी बिनपगारी काम करावे लागत आहे. पगारकपातीचे संकट तर अनेकांना सहन करावे लागत आहे. कोव्हिडच्या या संकटामुळे यावर्षी अनेकांची पगारवाढ थांबवण्यात आली आहे त्यामुळे बोनस मिळणे तर दूरची गोष्ट आहे. पण यावेळीही टाटा समुहाने (Tata Group) ने त्यांचे वेगळेपण दाखवून दिले आहे. या कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर केला आहे. कोरोनाच्या संकटकाळात होणारी ही आर्थिक मदत या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची आहे. टाटा स्टीलने (Tata Steel) सोमवारी या बोनसबाबत घोषणा केली. टाटा स्टीलकडून एकूण 235.54 कोटी रुपयांचा बोनस देण्यात येणार आहे. या बोनसचे वाटप एकूण 24 हजार 74 कर्मचाऱ्यांमध्ये होणार आहे. जमशेदपूर युनिटमधील ट्यूब डिव्हिजनच्या एकूण 12 हजार 807 कर्मचाऱ्यांना 142.05 कोटी रुपये तर उर्वरित 93.49 कोटी रुपये कलिंगानगर युनिट, मार्केटिंग आणि विक्री, नोवामुंडी, जामाडोबा, झरिया आणि बोकारो मायनसच्या 11 हजार 267 कर्मचाऱ्यामध्ये वाटली जाणार आहे. महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या या घोषणेनंतर कर्मचाऱ्याना कमीत कमी 26 हजार 839 तर जास्तीत जास्त 3 लाख 1 हजार 402 रुपये मिळतील. बोनसची रक्कम याआधी निश्चित केलेल्या फॉर्मूल्यानुसार दिली जाणार आहे. टाटा स्टीलच्या या बोनस करारावर टाटा स्टीलचे एमडी टीव्ही नरेंद्रन आणि टाटा वर्कर्स युनियनचे अध्यक्ष आर रवी यांनी स्वाक्षरी केली आहे. अहवालातील माहितीनुसार, गेल्या वर्षाच्या तुलनेत ही रक्कम 4 कोटी रुपयांनी कमी आहे. यावर्षी मिळणारी बोनसची रक्कम जास्त यावर्षी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये अधिक रक्कम पोहचणार आहे. या अहवालात दिलेल्या माहितीच्या आधारे, ग्रेट रिव्हिजननुसार वाढलेले बेसिक पे, डीए आणि 18 महिन्यातील अनुशेष यामुळे या वर्षी बोनसची रक्कम अधिक असेल. गेल्यावर्षीपेक्षा बोनसची रक्कम 2.7 टक्क्यांनी कमी झाली आहे. गेल्यावर्षी 15.6 टक्के तर यावर्षी 12.9 टक्के बोनस मिळत आहे. मात्र गेल्यावर्षी बोनसची जास्तीत जास्त रक्कम 2.36 लाख होती, तिच यावर्षी 3.01 लाख आहे.
    First published:

    Tags: Tata group

    पुढील बातम्या