जाहिरात
मराठी बातम्या / मनी / देश पुन्हा 1000 रुपयांची नोट घेऊन येणार का? पाहा RBI गव्हर्नर काय म्हणाले

देश पुन्हा 1000 रुपयांची नोट घेऊन येणार का? पाहा RBI गव्हर्नर काय म्हणाले

देश पुन्हा 1000 रुपयांची नोट घेऊन येणार का? पाहा RBI गव्हर्नर काय म्हणाले

RBI 1000 रुपयांची नोट आणणार आहे का, याचे उत्तर RBI गव्हर्नरनी दिले आहे. पाहूया हजार रुपयांच्या नोटीवर सरकारची भूमिका काय?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 मे : RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मुंबईत 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच भाष्य केलेय. यावेळी त्यांनी देशातील सर्वात मोठी नोट चलनातून काढून टाकण्याचा निर्णय का घेण्यात आला आणि याचं कारणं काय याविषयी सविस्तर माहिती दिली. यासोबतच आरबीआय 1000 रुपयांची नोट आणणार आहे का, याचे उत्तर आरबीआय गव्हर्नर यांनी दिले आहे. शक्तिकांत दास म्हणाले की, हजार रुपयांची नोट काढण्याविषयी अद्याप कोणताही प्लान झालेला नाही.

News18लोकमत
News18लोकमत

1000 आणि 500 ​​रुपयांच्या जुन्या नोटा कधी बंद झाल्या

8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1000 आणि 500 ​​रुपयांच्या नोटा चलनातून बाद होत असल्याची घोषणा टेलिव्हिजनच्या माध्यमातून केली. त्याच रात्री 12 वाजल्यानंतर त्या वेळी चलनात असलेल्या 1000 आणि 500 ​​रुपयांच्या नोटा यापुढे लीगल टेंडर राहिल्या नाहीत. देशातील नोटाबंदीचा हा निर्णय काळा पैसा रोखण्याच्या उद्देशाने घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर अनेक दिवस हजार आणि 500 रुपयांच्या नोटा बँकेत बदलून जमा करताना लोकांची प्रचंड गर्दी झाल्याचे दृश्य आजही मनात ताजे आहे. तुम्हीही या रांगेत उभे राहिले असालच.

AC फिल्टर एवढ्या दिवसात करा स्वच्छ, अन्यथा कूलिंग होईल कमी अन् वाढेल उष्णता

2 हजारांच्या नोटांविषयी काय म्हणाले गव्हर्नर?

मुंबईत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याबाबत सांगितले की, चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून लोकांनी 4 महिन्यांचा कालावधी गांभीर्याने घ्यावा. एवढा वेळ नोटा बदलण्यासाठी पुरेसा आहे. आरबीआय गव्हर्नर म्हणाले की भारताची करेंसी मॅनेजमेंट सिस्टम खूप मजबूत आहे.

होम लोनवर वाचवता येईल बक्कळ टॅक्स! फक्त ही ऑफर विसरु नका

500 रुपयांच्या अधिक नोटा चलनात आणण्याबाबत RBI गव्हर्नर काय म्हणाले?

RBI गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, 500 रुपयांच्या आणखी नोटा चलनात आणण्याचा निर्णय जनतेच्या मागणीवर अवलंबून असेल. विशेष म्हणजे, शुक्रवारी, 19 मे रोजी संध्याकाळी, आरबीआयचा निर्णय समोर आला की 2000 रुपयांची नोट चलनातून बाहेर काढली जात आहे. ते बदलण्यासाठी आणि बँकांमध्ये जमा करण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वेळ देण्यात आलाय. आज आरबीआयने असेही म्हटलेय की 2000 रुपयांची नोट लीगल टेंडर असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात