मुंबई : तुमच्याकडे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा तुम्हा ऑनलाईन पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. १ ऑक्टोबरपासून चार नियम बदलणार आहेत. त्याचा थेट परिणाम आपल्यावर होणार आहे. पेमेंट करण्यावर होणार आहे. हे नियम काय कोणते बदलणार जाणून घेऊया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा (RBI) कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन नियम बदलेल. नवीन नियमांमुळे क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंट पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होईल. आता जेव्हा डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन, पॉइंट ऑफ सेल (POS) किंवा अॅपद्वारे व्यवहार करेल तेव्हा सर्व तपशील एनक्रिप्टेड कोडमध्ये सेव्ह केले जातील. हे वाचा- पेट्रोल लवकरच स्वस्त होणार? RBI च्या ‘या’ निर्णयावर भवितव्य एखाद्या ग्राहकाने कंपनीचे क्रेडिट कार्ड घेतल्यापासून ३० दिवसांच्या आत ते वापलं नाही तर कंपनीने ग्राहकाला ते वापरण्यासाठी सांगेल. वन-टाइम-पासवर्ड (OTP) पुन्हा पाठवून त्याला अॅक्टिवेट करायला सांगेल. ग्राहकाने सुरू न केल्यास किंवा त्याची परवानगी न कळवल्यास त्याचे/तिचे क्रेडिट कार्ड खाते बंद करावे लागेल. ग्राहकाच्या संमतीशिवाय आता बँकांना क्रेडिट लिमिट वाढवता येणार नाही. पेमेंटवेळी इतर टॅक्स जोडतानाही ग्राहकांना पूर्ण माहिती देणं बंधनकारक असणार आहे. याशिवाय इतर को ब्रॅण्डेड कार्डना देखील हे नियम पाळणं बंधनकारक असणार आहे. हे वाचा-Business Idea: ‘ही’ मशिन घेऊन रस्स्त्याच्या कडेला कुठेही बसा अन् दररोज कमवा 2000 रुपये, 10 हजारात सुरू होणार काम टोकनयुक्त कार्ड व्यवहार सुरक्षित मानला जातो कारण व्यवहाराच्या प्रक्रियेदरम्यान वास्तविक कार्ड तपशील व्यापाऱ्यासोबत शेअर केला जात नाही. आता अॅपद्वारे टोकन जाईल. त्यानंतर कार्ड रिक्वेस्ट पुढे जाईल. या सेवेचा लाभ घेण्यासाठी कोणतेही अधिक चार्ज आता आकारले जाणार नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.