मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Business Idea: ‘ही’ मशिन घेऊन रस्स्त्याच्या कडेला कुठेही बसा अन् दररोज कमवा 2000 रुपये, 10 हजारात सुरू होणार काम

Business Idea: ‘ही’ मशिन घेऊन रस्स्त्याच्या कडेला कुठेही बसा अन् दररोज कमवा 2000 रुपये, 10 हजारात सुरू होणार काम

Business Idea: ‘ही’ मशिन घेऊन रस्स्त्याच्या कडेला कुठेही बसा अन् दररोज कमवा 2000 रुपये, 10 हजारात सुरू होणार काम

Business Idea: ‘ही’ मशिन घेऊन रस्स्त्याच्या कडेला कुठेही बसा अन् दररोज कमवा 2000 रुपये, 10 हजारात सुरू होणार काम

वाहन स्वस्त असो वा महागडे वाहतूक पोलिस तपासणीदरम्यान इतर आवश्यक कागदपत्रांसह प्रदूषण प्रमाणपत्र (पीयूसी) नक्कीच मागतात आणि ती नसल्यास वाहनचालकाला दंड आकारला जातो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 20 सप्टेंबर: जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल आणि कमी गुंतवणुकीत मोठा नफा मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही एक अशी बिझनेस आयडिया सांगत आहोत, जी तुमच्यासाठी कमाईचा एक उत्तम मार्ग बनू शकते. तुम्ही प्रदूषण चाचणी केंद्र उघडून तुमचा व्यवसाय सुरू करू शकता.मोटार वाहन कायद्यांतर्गत प्रदूषण प्रमाणपत्र (PUC) अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळं पीयूसी सेंटर चालणार याची हमी मिळते.

सर्व वाहनांना प्रदूषण प्रमाणपत्र आवश्यक:

वाहन स्वस्त असो वा महागडे वाहतूक पोलिस तपासणीदरम्यान इतर आवश्यक कागदपत्रांसह प्रदूषण प्रमाणपत्र (पीयूसी) नक्कीच मागतात आणि ती नसल्यास वाहनचालकाला दंड आकारला जातो. म्हणजेच वाहनाचा आरसी-परवाना-विमा यासोबतच प्रदूषण प्रमाणपत्र हे अत्यंत महत्त्वाचं आहे. केंद्रानं लागू केलेल्या मोटार वाहन कायद्यात हे प्रमाणपत्र नसल्यास 10,000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

तुम्ही दररोज 2000 रुपये कमवू शकता-

दंडाची ही रक्कम टाळण्यासाठी प्रत्येक वाहनधारकाला पीयूसी असणं आवश्यक आहे. मग तो दुचाकी किंवा स्कूटर चालक असो किंवा मग कार किंवा अवजड वाहन चालक, प्रत्येकाला प्रदूषण प्रमाणपत्र आवश्यक आहे. ते मिळवण्यासाठी प्रत्येकाला पीयूसी सेंटरला यावंच लागतं.  म्हणजेच पीयूसी सेंटर उघडल्यास रोजचं चांगलं उत्पन्न मिळणं जवळपास निश्चित आहे. कमाईबद्दल बोलायचं झाल्यास प्रदूषण चाचणी केंद्राद्वारे तुम्ही दररोज 2000 रुपये कमवू शकता. म्हणजेच महिन्याला सुमारे 60,000 रुपये कमावू शकता.

 10 हजार गुंतवणुकीतून कामाला सुरुवात करा-

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करण्याची गरज नाही, परंतु तुम्ही हा व्यवसाय 10,000 रुपयांपासून सुरू करू शकता. प्रत्येक राज्यात प्रदूषण चाचणी केंद्राचे शुल्क वेगवेगळं आहे. पीयूसी केंद्र उघडण्यासाठी काही अटी व शर्तीही आहेत. ते फक्त पिवळ्या रंगाच्या केबिनमध्येच उघडता येते. केबिनची लांबी 2.5 मीटर, रुंदी 2 मीटर आणि उंची 2 मीटर असावी. याशिवाय केंद्रावर परवाना क्रमांक लिहिणं आवश्यक आहे.

हेही वाचा: Zero Cost Term Insurance: आता टर्म पॉलिसी बंद केल्यावर प्रीमियम मिळेल परत, वाचा आश्चर्यकारक फायदे

अशा प्रकारे PUC बनवली जाते-

सामान्यत: प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र हे वाहनाचा प्रकार आणि इंधनाच्या प्रकारानुसार बनवलं जातं. त्यासाठी 60 ते 150 रुपये आकारले जातात. PUC प्रमाणपत्राची वैधता नवीन वाहनासाठी 1 वर्ष आणि जुन्या वाहनासाठी 6 महिने आहे. प्रदुषण तपासणी केंद्रासंदर्भातील इतर मार्गदर्शक तत्त्वांबद्दल बोलायचं झाल्यास ते पेट्रोल पंप / ऑटोमोबाईल वर्कशॉप जवळ उघडणे आवश्यक आहे. प्रदूषण केंद्रात तपासण्यात आलेल्या सर्व वाहनांचा तपशील एक वर्ष संगणकात ठेवणं आवश्यक आहे. याशिवाय वाहनांची तपासणी केल्यानंतर दिलेल्या प्रमाणपत्रावर शासनाकडून प्राप्त झालेले स्टिकर लावणं बंधनकारक आहे.

व्यवसाय अशा प्रकारे सुरू होऊ शकतो-

प्रदूषण तपासणी केंद्र उघडण्यासाठी तुमच्या परिसरातील आरटीओ कार्यालयातून परवाना घ्यावा लागतो. यासाठी अर्ज करण्यासोबतच 10 रुपयांचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल. स्थानिक प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागेल. प्रत्येक राज्यात प्रदूषण चाचणी केंद्राचे शुल्क वेगवेगळे आहे. काही राज्यांमध्ये ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे संगणक, यूएसबी वेबकॅम, इंकजेट प्रिंटर, वीजपुरवठा, इंटरनेट कनेक्शनसह स्मोक अॅनालायझर असणं आवश्यक आहे.

First published:

Tags: Business, Business News