आलोक प्रियदर्शी, प्रतिनिधी मुंबई : एकीकडे CNG आणि PNG चे दर वाढण्याचं टेन्शन असताना इंधनाबाबत मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आरबीआय लवकरच एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. जर हा निर्णय झाला तर त्याचा सगळ्यात मोठा फायदा भारताला होणार आहे. आरबीआय लवकरच रुपया-रुबलमधील द्विपक्षीय व्यापारासाठी बँकांना मान्यता देऊ शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण ६ हून अधिक रशियन बँकांच्या नावांवर अर्थ मंत्रालय आणि आरबीआय यांच्यात सध्या चर्चा सुरू आहे. या सर्व बँका भारतीय बँकांशी करार करत आहेत. पण त्यावर अजून आरबीआयकडून अंतिम मंजुरी मिळणं अद्याप बाकी आहे. पुढच्या आठवड्यात कदाचित ही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
Rupee-Ruble मध्ये Bilateral Trade ला घेऊन Russian बँकाना ही मंजुरी लवकरच मिळण्याची शक्यता आहे. यासाठी एक लिस्ट तयार करण्यात आली असून ते RBI कडे पाठवण्यात आली आहे. या लिस्टमध्ये Novikombank, Bank Rossiya, Bank Otkritie सारख्या मोठ्या बँकांची नावं आहेत. PSCB ने देखील YES Bank बँकेत Ruppe खातं उघडलं आहे.
VEB, VTB, Sber बँक देखील लवकरच भारतीय बँकांशी करार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये भारतातील SBI, Canera Bank, UCO सारख्या बँकांची नाव समोर आली आहेत. आता ह्या करारावर RBI कडून कधी मंजुरी मिळणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. यामुळे रुपया आणि रशियन चलन रुबलमधील व्यवसायाला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
हे वाचा-तुमच्या EPFO खात्यावर पैसे जमा होतात की नाही कसं चेक करायचं? वापरा ही ट्रिक
एका अहवालानुसार 2021 मध्ये, भारताकडून रशियाला 53.4 टक्के पेमेंट रूबलमध्ये तर 38.3 टक्के डॉलरमध्ये करण्यात आले होते. रुबेलसाठी रुपयामध्ये भारताला जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे हा करार झाला तर आपल्याला इंधनाच्या दृष्टीनं फायदा होऊ शकतो.
आता आपल्याला रुबेलसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे आपल्याला इंधनाची मूळ किंमत अधिक इतर टॅक्स मिळून इंधन महाग पडतं. मात्र हा करार झाला तर त्यामुळे भारताचा फायदा होईल. रुपया आणि रशियन चलन रुबलमधील व्यवसायाला चालना मिळेल आणि जास्तीचे पैसे जाणार नाहीत. त्यामुळे पेट्रोल स्वस्त होऊ शकतं अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Petrol, Rbi, Rbi latest news