मराठी बातम्या /बातम्या /मनी /

रिझर्व्ह बँकेकडून 'या' बँकेचा परवाना रद्द, खातेधारकांवर काय परिणाम होणार? चेक करा

रिझर्व्ह बँकेकडून 'या' बँकेचा परवाना रद्द, खातेधारकांवर काय परिणाम होणार? चेक करा

महाराष्ट्रातील नाशिक शहरात असलेल्या इंडिपेंडन्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना रद्द करताना, आरबीआयने संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांनाही याबाबत कळवले आहे. बँकेने नियमानुसार ग्राहकांच्या ठेवी परत करण्याबाबत पावले उचलण्यास सांगितले आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 4 फेब्रुवारी: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) महाराष्ट्राच्या इंडिपेंडन्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा (Independence Co-operative Bank Ltd) परवाना रद्द केला आहे. ही बँक आता ग्राहकांना सेवा देऊ शकणार नाही. त्यामुळे बँक 03 फेब्रुवारी 2022 रोजी व्यवसाय बंद झाल्यापासून बँकिंग व्यवसाय करणे बंद करेल, असं RBI ने एका निवेदनात म्हटले आहे. आरबीआयने गुरुवारी हा आदेश दिला. आरबीआयने आपल्या आदेशात म्हटले आहे की, बँकेची आर्थिक स्थिती पाहता रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षीही त्यावर काही निर्बंध लादले होते. त्या निर्णयामुळे ग्राहकांना 6 महिन्यांपासून पैसे काढता आले नाहीत. बँकेच्या व्यावसायिक स्थितीत सुधारणा न झाल्याने आता परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल नाही आणि भविष्यात आणखी कमाई होण्याची शक्यता नाही, असे आरबीआयने आपल्या निर्णयात म्हटले आहे. अशा स्थितीत परवाना रद्द करणे हे ग्राहकांच्या हिताचे आहे. Tata Group च्या 'या' शेअरला ब्रोकरेज फर्मची BUY रेटिंग, Rakesh Jhunjhunwala यांनीही स्टेक वाढवले नियमानुसार ग्राहकांना पैसे मिळतील महाराष्ट्रातील नाशिक शहरात असलेल्या इंडिपेंडन्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना रद्द करताना, आरबीआयने संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांनाही याबाबत कळवले आहे. बँकेने नियमानुसार ग्राहकांच्या ठेवी परत करण्याबाबत पावले उचलण्यास सांगितले आहे. आरबीआयच्या आदेशानुसार, बँकेच्या ग्राहकांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत केल्या जातील. बँकेच्या आकडेवारीनुसार, येथे 99 टक्के खातेधारकांना त्यांची संपूर्ण रक्कम मिळण्याचा हक्क आहे, म्हणजेच त्यांच्या बँक खात्यात 5 लाख किंवा त्याहून कमी रक्कम जमा आहे. अशा परिस्थितीत बँक रद्द करण्याच्या निर्णयाचा फटका फक्त 1 टक्के ग्राहकांना बसणार आहे. Cryptocurrency वर केवळ 30% टॅक्स नाही तर 28% GST ही द्यावा लागणार? वाचा सविस्तर फक्त 5 लाख रुपयांपर्यंत परत मिळेल जर बँक बुडली तर ग्राहकांना जास्तीत जास्त 5 लाख रुपये परत मिळू शकतात. यापेक्षा जास्त रक्कम मिळू शकत नाही. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट कॉर्पोरेशन (DICGC) च्या नियमांनुसार, प्रत्येक ग्राहकाचा 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींसाठी विमा काढला जातो. बँकेने आरबीआयला दिलेल्या माहितीनुसार, 27 जानेवारी 2022 पर्यंत बँकेने ग्राहकांना 2.36 कोटी रुपये परत केले आहेत.
First published:

Tags: Bank, Bank details, Finance, Fixed Deposit, License, Money, Rbi

पुढील बातम्या