जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Tata Group च्या 'या' शेअरला ब्रोकरेज फर्मची BUY रेटिंग, Rakesh Jhunjhunwala यांनीही स्टेक वाढवले

Tata Group च्या 'या' शेअरला ब्रोकरेज फर्मची BUY रेटिंग, Rakesh Jhunjhunwala यांनीही स्टेक वाढवले

Tata Group च्या 'या' शेअरला ब्रोकरेज फर्मची BUY रेटिंग, Rakesh Jhunjhunwala यांनीही स्टेक वाढवले

तिसऱ्या तिमाहीच्या आकडेवारीनुसार (Titan Q3 Result) या कालावधीत कंपनीचा नफा वार्षिक 135.6 टक्क्यांनी वाढून 987 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 419 कोटी रुपये होते. तिसर्‍या तिमाहीत टायटनची कमाई 30.6 टक्क्यांनी वाढून 9,515 कोटी रुपये झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 फेब्रुवारी : टाटा समूहाची कंपनी टायटनच्या (Titan Company) तिसऱ्या तिमाहीतील उत्कृष्ट निकालांमुळे बाजार विश्लेषक कंपनीच्या शेअरबद्दल बुलिश आहेत. कंपनीची मजबूत बॅलन्स शीट आणि मजबूत बिझनेस स्ट्रक्चर कंपनीच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहे आणि ते पुढेही करत राहील. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल आणि प्रभुदास लिलाधर यांनी गुंतवणूकदारांना टायटनचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh jhunjhunwala) यांच्या पोर्टफोलिओमध्ये टायटनचाही समावेश आहे. डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीतील डेटा पाहिल्यास, लक्षात येते की राकेश झुनझुनवाला यांनी टाटा समूहाच्या या कंपनीतील त्यांचा हिस्सा 3.80 टक्के (3,37,60,395 शेअर्स) वरून 4.02 टक्के (3,57,10,395 शेअर्स) पर्यंत वाढवला आहे. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत टायटन कंपनीचे 3.80 टक्के शेअर्स होते. राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांचीही टायटनमध्ये 1.07 टक्के भागीदारी आहे. तिसऱ्या तिमाहीचे निकाल तिसऱ्या तिमाहीच्या आकडेवारीनुसार (Titan Q3 Result) या कालावधीत कंपनीचा नफा वार्षिक 135.6 टक्क्यांनी वाढून 987 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 419 कोटी रुपये होते. तिसर्‍या तिमाहीत टायटनची कमाई 30.6 टक्क्यांनी वाढून 9,515 कोटी रुपये झाली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत 7,287 कोटी रुपये होती. वर्षिक आधारावर Titan चा EBITDA तिसऱ्या तिमाहीत 62.9 टक्क्यांनी वाढून 1398 रुपये कोटी झाला आहे, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 858 कोटी होता. Cryptocurrency वर केवळ 30% टॅक्स नाही तर 28% GST ही द्यावा लागणार? वाचा सविस्तर मोतीलाल ओसवाल यांच्याकडून BUY रेटिंग ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांच्या नोटमध्ये असे म्हटले आहे की, कंपनीचा ज्वेलरी सेगमेंट चांगली कामगिरी करत आहे. या सेगमेंट कंपनीने नवीन ग्राहक जोडले आहेत. जे एक चांगले लक्षण आहे. विक्री जोरदार सुरू आहे. कमाई वाढीचा आलेख देखील आकर्षक आहे. मोतीलाल ओसवाल यांनी टायटनच्या स्टॉकला बाय रेटिंग दिले आहे. प्रभुदास लिलाधर यांची 2833 रुपये टार्गेट प्राईज ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिलाधर (Prabhudas Lilladher) देखील विश्वास ठेवतात की टायटन आता अशा स्थानावर आहे जिथे ते नेटवर्क विस्तार, प्रादेशिक वाढ आणि हॉलमार्किंगमुळे मिळालेल्या नफ्यामुळे सोन्याच्या विक्रीत आपला बाजार हिस्सा वाढवू शकतात. घड्याळे आणि आयवेअर विभागातही कंपनी सतत विस्तार करत आहे. कंपनी स्मार्टवॉचच्या क्षेत्रातही पाऊल टाकत आहे, जो खूप उच्च वाढीचा विभाग आहे. बँक ग्राहकांनो लक्ष द्या! ‘या’ 4 बँकांनी बदलले आहेत महत्त्वाचे नियम कार्टलेन, टायटन आय प्लस आणि तनेरा या कंपनीच्या वाढीचे मुख्य कारण आहेत. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की मजबूत बॅलन्स सीट आणि चांगल्या मार्केट शेअरमुळे कंपनी वाढेल आणि तिचे शेअर्स चांगला परतावा देतील. प्रभुदास लिलाधर यांनी टायटनचा शेअरला बाय रेटिंग दिली आहे आणि त्याची टार्गेट प्राईज 2,833 रुपये ठेवली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात