जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Cryptocurrency वर केवळ 30% टॅक्स नाही तर 28% GST ही द्यावा लागणार? वाचा सविस्तर

Cryptocurrency वर केवळ 30% टॅक्स नाही तर 28% GST ही द्यावा लागणार? वाचा सविस्तर

Cryptocurrency वर केवळ 30% टॅक्स नाही तर 28% GST ही द्यावा लागणार? वाचा सविस्तर

केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात (Union Budget-2022) क्रिप्टोकरन्सीवर (Cryptocurrency) 30 टक्के प्राप्तिकर (Income Tax on Crypto) आकारण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यापाठोपाठ आता क्रिप्टोकरन्सी वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या (GST) कक्षेत आणण्यात येणार असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 03 फेब्रुवारी: केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात (Union Budget-2022) क्रिप्टोकरन्सीवर (Cryptocurrency) 30 टक्के प्राप्तिकर (Income Tax on Crypto) आकारण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यापाठोपाठ आता क्रिप्टोकरन्सी वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या (GST) कक्षेत आणण्यात येणार असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. सरकारने क्रिप्टोकरन्सीचा समावेश घोड्यांची शर्यत आणि लॉटरीच्या (Lottery) श्रेणीत केल्यामुळे या चर्चेला तोंड फुटलं आहे. सध्या खासगी लॉटरी आणि घोड्यांच्या शर्यतींवर 28 टक्के जीएसटी भरावा लागतो. त्यामुळे सरकार क्रिप्टोकरन्सीवरदेखील 28 टक्के जीएसटी आकारू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सरकारने क्रिप्टोकरन्सीला डिजिटल अॅसेट (Digital Asset) (मालमत्ता) मानून 30 टक्के प्राप्तिकर लावला आहे. क्रिप्टोची व्याख्या व्हर्च्युअल डिजिटल अॅसेटस (Virtual Digital Assets) म्हणून केली जाते. यामध्ये क्रिप्टोला ना तारणयोग्य (Security) म्हणून ग्राह्य धरण्यात आलं आहे आणि ना त्याला पैसा (Money) म्हणून मान्यता देण्यात आली आहे. याला सिक्युरिटीजचा (Securities) दर्जा दिला नाही तर याच्या खरेदी-विक्रीवर जीएसटी लागू होईल, यात शंका नाही, असं या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे वाचा- तुम्हाला मिळाले का Adani Wilmar कंपनीचे शेअर्स? अशाप्रकारे ऑनलाइन तपासा या कायद्यांमुळे जीएसटीचा मार्ग खुला प्राप्तिकर कायदा 1961 अन्वये, कोणत्याही स्रोताकडून प्राप्त झालेले उत्पन्न, ज्याचा उल्लेख करपात्र (Taxable) श्रेणीमध्ये केला गेला नाही, तो प्राप्तिकर आकारण्यायोग्य आहे. त्याचवेळी, कोणत्याही सेवेच्या पुरवठ्यावर विशेष सूट दिली गेली नसेल, तर त्यावर जीएसटी लागू होईल. क्रिप्टोकरन्सीसाठी अशी कोणतीही सूट नसल्यामुळे, जीएसटी अंतर्गत त्याचा समावेश होऊ शकतो. जीएसटीच्या कलम 2(75) नुसार, पैसा म्हणजे भारतीय कायदेशीर चलन किंवा फेमा (FEMA) कायद्यांतर्गत येणारे परदेशी चलन होय. बहुतेक आभासी चलने या व्याख्येत बसत नाहीत. त्यामुळे तो पैसा मानता येणार नाही. सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) कायदा 1956 , कलम 2 नुसार, सिक्युरिटीज म्हणजे शेअर्स, स्क्रिप्स, स्टॉक, बॉण्ड्स, डिबेंचर, डिबेंचर स्टॉक किंवा तत्सम स्वरूपाच्या कंपनी किंवा इतर कॉर्पोरेटमध्ये विक्रीयोग्य घटक होय. यामध्ये आभासी चलनाचा उल्लेख नाही. त्यामुळे, क्रिप्टोकरन्सीवर जीएसटी लागू शकतो. हे वाचा- बँक ग्राहकांनो लक्ष द्या! ‘या’ 4 बँकांनी बदलले आहेत महत्त्वाचे नियम आपल्या देशातील क्रिप्टो एक्सचेंज (Crypto Exchanges) त्यांच्या युझर्सकडून जीएसटी वसूल करतच आहेत. ते ट्रेडिंग फी (Trading Fee) देखील आकारतात. बिटकॉइन, इथरियम आणि इतर क्रिप्टोकरन्सीच्या खरेदी किंमतीत याचा समावेश केला जातो. एक्सचेंजेंस कर भरताना सरकारकडे जीएसटीच भरतात. अशा सगळ्या कारणामुळे क्रिप्टोकरन्सी जीएसटी कक्षेत येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात