नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : कोरोना व्हायरस (Coronavirus) लसीसंदर्भात वाढत्या सकारात्मक बातम्यांमुळे अपेक्षा वाढत आहेत. याचा परिणाम जगभरातील सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. सोन्याच्या किंमती यामुळे उतरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची किंमत 1929 डॉलर प्रति औंस पर्यंत घसरली आहे. तज्ज्ञांच्या मते, कोरोना व्हायरसची लस मिळण्यात जरी विलंब झाला तरी उपचारांची आशा आहे. अनेक थेरपींचे उपचारात्मक परिणाम दिसत आहेत. म्हणूनच अमेरिका आणि आशियाई बाजारात तेजी आली आहे. तज्ज्ञांच्या मते गुंतवणूकदारांनी सोन्याची नफावसुली या आठवड्यातही सुरू ठेवली आहे. तथापि, येत्या काही दिवसांत पुन्हा हलक्या तेजीची अपेक्षा केली जाऊ शकते.
यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व आणि जगातील इतर केंद्रीय बँकांच्या अभूतपूर्व प्रोत्साहन पॅकेजेसमुळे व्याजदर शून्याच्या जवळ आणले आहेत. यामुळे यावर्षी विदेशी बाजारात सोन्याच्या किंमतीत सुमारे 28 टक्क्यांची वाढ झाली आहे.
सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरू
सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा 44 रुपयांनी घसरून 53,040 रुपये झाले होते. शुक्रवारी बाजारात सोन्याचा दर 53,084 रुपये प्रति तोळावर बंद झाला होता.
(हे वाचा-30 हजारांपर्यंत पगार असणाऱ्यांसाठी सरकार मोठी घोषणा करण्याची शक्यता)
सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात एक किलो चांदीची किंमत 68,202 रुपयांवर आली होती, शुक्रवारी चांदी 68,408 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली होती.
आज काय होईल?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आज पुन्हा किंमतींमध्ये किंचित घसरण होऊ शकते. लॉकडाऊन काळात सोन्याने उच्चांक गाठला होता. लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार सोन्याच्या किंमती या वरच्या स्तरावरून 5000 रुपयांनी खाली आल्या आहेत.
(हे वाचा-आता टाटा ग्रुपही लाँच करणार Super app; एकाच ठिकाणी उपलब्ध होणार सर्व सेवा)
सोन्याची किंमत प्रति तोळा 56,200 रुपयांवरुन घसरून 51000 रुपये प्रति तोळावर आली आहे. त्याचबरोबर चांदी प्रति किलो 12000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. या कालावधीत किंमती 78000 रुपयांवरून घसरून 66000 रुपयांवर आल्या आहेत.