मराठी बातम्या /बातम्या /मनी /India Post Payments Bank: झिरो बॅलन्समध्ये सुरू करा खातं, मिनिमम बॅलन्सचं नो टेन्शन!

India Post Payments Bank: झिरो बॅलन्समध्ये सुरू करा खातं, मिनिमम बॅलन्सचं नो टेन्शन!

India Post Payments Bank: इंडिया पोस्ट पेमेंट बँक सर्व्हिसमध्ये 3 प्रकारची बचत खाती उघडण्याची सुविधा आहे- रेग्यूलर, डिजिटल आणि बेसिक सेव्हिंग अकाउंट

India Post Payments Bank: इंडिया पोस्ट पेमेंट बँक सर्व्हिसमध्ये 3 प्रकारची बचत खाती उघडण्याची सुविधा आहे- रेग्यूलर, डिजिटल आणि बेसिक सेव्हिंग अकाउंट

India Post Payments Bank: इंडिया पोस्ट पेमेंट बँक सर्व्हिसमध्ये 3 प्रकारची बचत खाती उघडण्याची सुविधा आहे- रेग्यूलर, डिजिटल आणि बेसिक सेव्हिंग अकाउंट

नवी दिल्ली, 23 डिसेंबर: आजकाल एखाद्याचं बँक खातं असणं अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अनेक सरकारी योजनांचा लाभ थेट बँक खात्यामध्ये पाठवला जातो. अशावेळी कमीतकमी रक्कम (Minimum Balance) मेंटन केल्याशिवाय जर तुम्ही खातं उघडू इच्छित आहात कर इंडिया पोस्ट पेमेंट बँक (India Post Payment Bank) एक चांगला पर्याय आहे.  इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागांना जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, ज्याठिकाणी अद्याप बँक नाही आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये शहरी भागातील पोस्ट ऑफिसमध्ये देखील खाते उघडता येईल. हे खाते पोस्टाच्या बचत खात्यापेक्षा वेगळे आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक खात्याला पोस्ट ऑफिसच्या बचत खात्याशी जोडता येईल.

ही बँक पूर्णपणे ऑनलाइन काम करते. अर्थात तुम्हाला खाते देखील ऑनलाइन उघडावे लागेल. इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला मोबाइल बँकिंग, SMS बँकिंग, मिस्ड कॉल बँकिंग, फोन बँकिंग आणि और QR कार्ड माध्यमातून बँकिंगच्या सुविधा मिळतील.

काय आहे या खात्याचं वैशिष्ट्य?

इंडिया पोस्ट पेमेंट बँक सर्व्हिसमध्ये 3 प्रकारची बचत खाती उघडण्याची सुविधा आहे- रेग्यूलर, डिजिटल आणि बेसिक सेव्हिंग अकाउंट. या तीनही खात्यांमध्ये ग्राहकांना 4 टक्के वार्षिक व्याज दिले जाते, मात्र व्याजाचे कम्पाउंडिंग तिमाही आधारावर केले जाते.

(हे वाचा-Gold Rates Today: सलग दुसऱ्या दिवशी उतरले सोन्याचे दर, वाचा काय आहे नवे भाव)

यामध्ये तुम्ही रेग्यूलर खाते उघडणार असाल तर झिरो बॅलन्सवर खाते उघडता येईल. यामध्ये तुम्हाला मिनिमम बॅलन्स मेंटेन करावा लागणार नाही. SMS च्या माध्यमातून तुम्हाला ट्रान्झॅक्शनची माहिती देखील मिळेल. शिवाय तुम्ही क्यूआर कोडच्या माध्यमातून विविध पेमेंट देखील करू शकता. IPPB द्वारे देण्यात आलेल्या एटीएम कार्डवर (ATM Card) एक क्यूआर कोड देण्यात आला आहे, जो मोबाइलवरुन स्कॅन केल्यानंतर पासवर्ड किंवा खाते क्रमांकाशिवाय ओटीपीच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता.

First published:
top videos

    Tags: Post office, Post office bank