मुंबई, 16 मार्च : येस बँकेच्या (YES Bank) खातेदारांसाठी आनंदाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर अर्थ मंत्र्यांनी सांगितलं होतं की, अर्थ मंत्रालयाकडून लवकरच येस बँक प्रकरणात (Yes Bank Crisis) नोटिफिकेशन जारी करण्यात येणार आहे. हे नोटिफिकेशन आल्यानंतर 3 दिवसांच्या आत येस बँकेवरील निर्बंध हटवण्यात येणार आहेत. 3 दिवसांमध्येच मोरेटेरियम पीरियड (Moratorium On Yes Bank) संपवण्यात येईल. (हे वाचा- येस बँकेच्या पुनर्रचनेसाठी कॅबिनेटची मंजूरी, SBI करणार 7,250 कोटींची गुंतवणूक) अर्थमंत्र्यांच्या या घोषणेनुसार आज येस बँकेकडून ट्विट करण्यात आलं की खातेदारांवरील निर्बंध आता हटवण्यात येणार आहेत. 18 मार्च संध्याकाळी 6 नंतर येस बँकेच्या सर्व खातेदारांवरील निर्बंध हटवण्यात येणार आहेत.
We will resume full banking services from Wed, Mar 18, 2020, 18:00 hrs. Visit any of our 1,132 branches from Mar 19, 2020, post commencement of banking hrs to experience our suite of services. You will also be able to access all our digital services & platforms@RBI @FinMinIndia
— YES BANK (@YESBANK) March 16, 2020
5 मार्च रोजी येस बँकेवर आरबीआयकडून निर्बंध लादण्यात आले होते. या निर्बंधनुसार येस बँकेच्या खातेदारांना केवळ 50,000 रुपयेच काढण्याची मुभा होती. आता 18 तारखेपासून हे निर्बंध हटवण्यात आल्याने खातेदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. येस बँकेला रूळावर आणण्यासाठी SBI सह खाजगी बँकाही प्रयत्नशील संकटग्रस्त येस बँकमध्ये (Yes Bank) 7,250 कोटी रुपये गुंतवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ला परवानगी मिळाली आहे. गुंतवणुकीसंदर्भात शुक्रवारी सीतारामन यांनी सांगितलं की, SBI येस बँकेमध्ये 49 टक्के भागीदारी खरेदी करेल. एसबीआयला 10 रुपये प्रति शेअर या दराने येस बँकेचे 725 कोटी शेअर खरेदी करण्यास परवानगी मिळाली आहे. SBI 3 वर्षांसाठी आपली भागीदारी 26 टक्क्यांपेक्षा कमी करू शकत नाही. त्याचप्रमाणे काही खासगी गुंतवणूकदारही येस बँकेत गुंतवणूक करणार आहेत. त्यांच्यासाठी लॉक इन पीरियडही 3 वर्षांचा असेल. त्यांच्यासाठी स्टेक लिमिट 75 टक्क्यांपर्यंत आहे. 7 दिवसांमध्ये करणार नवीन बोर्डाची निर्मिती अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं होतं की, नोटिफिकेशन जारी केल्यानंतर 7 दिवसांमध्ये बँकेच्या नवीन बोर्डाची नियुक्ती करण्यात येईल. नवीन बोर्डाची निर्मिती झाल्यानंतर आरबीआयने नियुक्त केलेले प्रशासक प्रशांत कुमार यांना हटवण्यात येईल. सीतारामन यांनी सांगितले की, नवीन बोर्डामध्ये काही सदस्य स्टेट बँक ऑफ इंडियाचे सुद्धा असतील.