Home /News /money /

कोरोनाचं संकट वाढतंय! जाणून घ्या, तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमधून यासाठी मेडिकल क्लेम मिळणार का?

कोरोनाचं संकट वाढतंय! जाणून घ्या, तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमधून यासाठी मेडिकल क्लेम मिळणार का?

देशामध्ये कोरोनाचं संकट वाढत आहे. अशा वेळी तुम्ही काढलेल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचा तुम्हाला फायदा होणार आहे का, असा प्रश्न नक्की पडला असेल.

    मुंबई, 15 मार्च : देशामध्ये कोरोनाचं संकट वाढत आहे. कोरोना व्हायरसने (Coronavirus) बाधित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. अशा वेळी तुम्ही काढलेल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचा तुम्हाला फायदा होणार आहे का, असा प्रश्न नक्की पडला असेल. अनेकांनी हेल्श इन्शुरन्स देणाऱ्या कंपन्यांना याबाबत फोन करून विचारणा केली आहे. तर याचं उत्तर होय आहे. बहुतेक हेल्श इन्शुरन्स पॉलिसी कोरोनासाठी कव्हर देत आहेत. हेल्थ इन्शुरन्स सेक्टरमधील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार जर तुम्ही खूप अगोदर इन्शुरन्स काढला असेल, तर त्या पॉलिसीअंतर्गत कोरोना व्हायरससुद्धा येईल. मात्र कोरोना बाधित झाल्यानंतर तुम्ही पॉलिसी काढली असेल, तर इन्शुरन्ससाठी तुम्हाला क्लेम करता येणार नाही. अधिकतर इन्शुरन्स कंपन्यांमध्ये कोरोनासाठी मेडिकल क्लेम करता येत आहे, मात्र प्रत्येक पॉलिसीनुसार नियम व अटी वेगळ्या आहेत. त्या जाणून घेतल्यास हे समजणं सोपं होईल की तुमची पॉलिसी कोरोनासाठी इन्शुरन्स देत आहे की नाही. (हे वाचा-11 रुपयांत बचावाची गॅरेंटी देत होता कोरोना बाबा, पोलिसांनी केली तुरुंगात रवानगी) कोरोना व्हायरसचा जगभरामध्ये प्रादुर्भाव वाढल्यानंतर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी देणाऱ्या कंपन्यांना सुगीचे दिवस आले आहेत. मोठ्या प्रमाणात अनेकांनी हेल्थ इन्शुरन्स काढला आहे. पॉलिसी बझारने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या संकटानंतर इन्शुरन्सची मागणी जवळपास 30 ते 40 टक्क्यांनी वाढली आहे. डेंग्यू किंवा मलेरियाप्रमाणेच कोरोनासाठी तुमच्या सध्याच्या पॉलिसीमध्ये कव्हर मिळणार आहे. कोरोनासारख्या रोगांसाठी अनेक पॉलिसीमध्ये 30 दिवसांचा वेटिंग पीरियड असतो. यानंतर तुम्ही त्याचा फायदा उचलू शकता. (हे वाचा-कोरोनाचा कहर, मुलाने हॉस्पिटलच्या खिडकीतून पाहिलं वडिलांचं शव) रेलिगेअर हेल्थ प्रोडक्टचे हेड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉलिसी खरेदी केल्यानंतर 30 दिवसानंतर यासारख्या रोगासाठी कव्हर मिळतो. मात्र प्रत्येक पॉलिसीप्रमाणे हा कालावधी विभिन्न असतो. त्याकरता तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. पॉलिसी बाजार डॉट कॉमच्या हेल्थ डिव्हिजनचे बिझनेस हेड अमित छाबड़ा सांगतात की, कोणत्याही ग्राहकाकडे आधीपासून पॉलिसी असेल तर त्याने हे तपासून पाहणं आवश्यक आहे की त्यांच्या पॉलिसीमध्ये यासारखे आजार वगळण्यात तर आले नाही आहेत. Global pandemic तुमच्या पॉलिसीमधून कव्हर होतो की नाही, हे तपासणं आवश्यक आहे. विमा नियामक संस्था असणाऱ्या IRDAI ने याकरता काही नियम देखील सांगितले आहेत. कोरोनासंबधित दाव्यांना लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे हेल्थ इन्शुरन्स असल्यास या संकटाशी सामना करणं सोप असल्याचंही IRDAI सांगण्यात येत आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या