मराठी बातम्या /बातम्या /मनी /डेबिट-क्रेडिट कार्डावरील CVV क्रमांक मिटवून टाकणं आवश्यक, काय सांगते RBI?

डेबिट-क्रेडिट कार्डावरील CVV क्रमांक मिटवून टाकणं आवश्यक, काय सांगते RBI?

कार्डच्या साह्याने कोणताही ऑनलाइन व्यवहार करताना सीव्हीव्ही नंबर टाकल्याशिवाय व्यवहार पूर्णच होत नाही. काही वेबसाइट्स आपण वारंवार वापरत असलो, तर ब्राउझरमध्ये कार्ड डिटेल्स सेव्ह करून ठेवण्याची सुविधा असते; मात्र त्यात सीव्हीव्ही नंबर सेव्ह केला जात नाही.

कार्डच्या साह्याने कोणताही ऑनलाइन व्यवहार करताना सीव्हीव्ही नंबर टाकल्याशिवाय व्यवहार पूर्णच होत नाही. काही वेबसाइट्स आपण वारंवार वापरत असलो, तर ब्राउझरमध्ये कार्ड डिटेल्स सेव्ह करून ठेवण्याची सुविधा असते; मात्र त्यात सीव्हीव्ही नंबर सेव्ह केला जात नाही.

कार्डच्या साह्याने कोणताही ऑनलाइन व्यवहार करताना सीव्हीव्ही नंबर टाकल्याशिवाय व्यवहार पूर्णच होत नाही. काही वेबसाइट्स आपण वारंवार वापरत असलो, तर ब्राउझरमध्ये कार्ड डिटेल्स सेव्ह करून ठेवण्याची सुविधा असते; मात्र त्यात सीव्हीव्ही नंबर सेव्ह केला जात नाही.

पुढे वाचा ...

    नवी दिल्ली, 24 जुलै: ऑनलाइन आर्थिक व्यवहार (Online Transactions) हा आता आपल्या रोजच्या जगण्याचा भाग आहे. आधी नोटबंदीमुळे कॅशलेस व्यवहार (Cashless Transactions) करण्याची सवय झाली. नंतर कोरोना कालखंडामुळे प्रत्यक्ष व्यवहारांवर बंधनंच आली. त्यामुळे रोखीने व्यवहार करण्यावर खूपच मर्यादा आल्या. साहजिकच ऑनलाइन व्यवहार वाढले. ऑनलाइन व्यवहार दोन-तीन प्रकारचे असतात. एक म्हणजे यूपीआय (UPI) किंवा मोबाइल वॉलेट्सच्या साह्याने केलेले व्यवहार. दुसरं म्हणजे इंटरनेट बँकिंग (Internet Banking) आणि तिसरं म्हणजे डेबिट (Debit Card) किंवा क्रेडिट कार्ड्सच्या (Credit Card) साह्याने ऑनलाइन व्यवहार.

    या तिन्ही प्रकारांचा वापर आता रूढ झाला आहे. दरम्यान अशाप्रकारे आर्थिक व्यवहार करताना विशेष खबरदारी बाळगणं आवश्यक आहे. तुमच्याकडे असलेलं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड तुम्ही नीट निरखून पाहिलेलं आहे का? कार्डच्या वरच्या बाजूला तुमचं म्हणजे कार्डधारकाचं नाव, 16 आकडी कार्ड क्रमांक आणि कार्डच्या वैधतेची तारीख (Card Validity) या बाबी एम्बॉस केलेल्या असतात. पाठीमागच्या बाजूला कार्डधारकाच्या सहीसाठी जागा ठेवलेली असते. त्या पॅनेलच्याच पुढे तीन आकडी क्रमांक दिलेला असतो. त्याला CVV number असं म्हणतात. कार्ड व्हेरिफिकेशन व्हॅल्यू असा त्याचा फुल फॉर्म आहे.

    हे वाचा-Gold Price Today: 1000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, खरेदी करण्याची सुवर्णसंधी!

    कार्डच्या साह्याने कोणताही ऑनलाइन व्यवहार करताना सीव्हीव्ही नंबर टाकल्याशिवाय व्यवहार पूर्णच होत नाही. काही वेबसाइट्स आपण वारंवार वापरत असलो, तर ब्राउझरमध्ये कार्ड डिटेल्स सेव्ह करून ठेवण्याची सुविधा असते; मात्र त्यात सीव्हीव्ही नंबर सेव्ह केला जात नाही. बाकीचे सर्व डिटेल्स सेव्ह केले जातात. यामागचं कारण असं असतं, की आपल्या नेहमीच्या उपकरणावरून कोणी दुसरी व्यक्ती व्यवहार करत असेल, तर त्या व्यक्तीला सीव्हीव्ही नंबर माहिती नसल्याने व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजेच तो नंबर टाकल्याशिवाय तुमच्या कार्डवरून पैसे डेबिट होऊ शकत नाहीत.

    सीव्हीव्ही नंबर सिक्युरिटीसाठी (Security) अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) असा सल्ला देते, की तुमचं डेबिट किंवा क्रेडिट यांपैकी कोणत्याही प्रकारचं कार्ड तुमच्या हातात पडलं, की त्यावरचा सीव्हीव्ही नंबर घालवून (Erasing CVV Code) टाकावा. अर्थातच, कार्डवरून तो नंबर घालवण्यापूर्वी तुम्ही स्वतः लक्षात ठेवणं किंवा तुमच्याकडे अत्यंत सुरक्षित ठिकाणी लिहून ठेवणं अत्यावश्यक आहे.

    हे वाचा-बिझनेस सुरू करायचाय? पोहे करतील काम; 25 हजार गुंतवलेत तरी दीड लाख कमाई

    कार्डवरचा सीव्हीव्ही नंबर घालवून टाकण्याचं कारण असं, की दुर्दैवाने तुमचं कार्ड गहाळ झालं किंवा चोरीला गेलं आणि दुसऱ्या कोण्या व्यक्तीच्या हाती लागलं, तर ती व्यक्ती सीव्हीव्ही नंबर नसलेल्या कार्डचा उपयोग ऑनलाइन व्यवहारांसाठी करूच शकणार नाही. कारण कार्डद्वारे केला जाणारा कोणताही ऑनलाइन व्यवहार सीव्हीव्ही नंबरशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. म्हणूनच ऑनलाइन व्यवहारांमधल्या सुरक्षिततेसाठी, फसवणुकीपासून वाचण्यासाठी हा सीव्हीव्ही नंबर अत्यंत आवश्यक आहे.

    First published:

    Tags: Credit card, Rbi, Rbi latest news, Shopping debit card