जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: 1000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, खरेदी करण्याची सुवर्णसंधी!

Gold Price Today: 1000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, खरेदी करण्याची सुवर्णसंधी!

Gold Price Today: 1000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, खरेदी करण्याची सुवर्णसंधी!

Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत घसरण सुरूच आहे. जाणून घ्या काय आहेत आजचे लेटेस्ट दर

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 24 जुलै: भारतीय बाजारात सोन्याच्या दरामध्ये होणारी घसरण (Gold Price Today) सुरूच आहे. एमसीएक्सवर सोन्याचे दर (Gold price on MCX) 0.25 टक्क्यांनी घसरून  47,510 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीची वायदे किंमत 0.22 टक्क्यांनी घसरून 67,520 रुपये प्रति किलो झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात कमजोरी आल्याने गेल्या पाच सत्रांमध्ये जवळपास 1000 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे. अर्थात गेल्या आठवडाभरात ही घसरण झाली आहे. जाणकारांच्या मते एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange) सोन्याचे दर (Gold Price) ₹46,850 ते ₹48,400 या दरम्यान असतील. अमेरिकन डॉलरचे मुल्य वधारल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात आज घसरण पाहायला मिळाली आहे. स्पॉट गोल्डमध्ये 0.2 टक्क्यांची घसरण झाल्याने सोन्याचे दर 1,803.33 डॉलर प्रति औंसवर आहेत. गेल्या पाच दिवसात अर्थात या आठवड्यात मौल्यवान धातूचे दर जवळपास 0.4% टक्क्यांनी उतरले आहेत. हे वाचा- दोन मोठ्या बँकांच्या खासगीकरणाच्या हालचाली सुरू; ग्राहकांवर काय होणार परिणाम? काय आहे तज्ज्ञांचं मत? तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या काळात सोन्याचे दर निश्चित सीमेंतर्गत राहतील. पुढील आठवड्यात होणाऱ्या फेडच्या बैठकीवर देखील व्यावसायिकांची नजर आहे. कमोडिटी एक्सपर्ट्सच्या मते जुलैनंतर सोन्याचे दर वधारतील, अशावेळी आता गुंतवणूक केल्यास भविष्यात चांगला फायदा मिळू शकेल. मात्र भविष्यात खरेदी तुम्हाला महाग पडू शकेल. हे वाचा- नोकरी करुन कंटाळा आलाय? मग हा व्यवसाय करा आणि दिवसाला कमवा 4 हजार रुपये ₹48,500 रुपयांवर पोहोचेल सोनं एक्सपर्ट सांगतात की सोन्यामध्ये सुरू असणारी घसरण अस्थायी आहे. गुंतवणुकदारांना या घसरणीकडे एक संधी म्हणून पाहिले पाहिजे. सराफा तज्ज्ञांच्या मते सोन्याचे दर लवकरच बदलतील. ट्रेड रिव्हर्सलनंतर एका महिन्यात सोन्याचे दर  ₹48,500 प्रति तोळावर पोहोचू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात