Home /News /money /

Gold price today: सलग तिसऱ्या दिवशी उतरलं सोनं, तरीही सोन्याचे भाव 48 हजार रुपयांपार!

Gold price today: सलग तिसऱ्या दिवशी उतरलं सोनं, तरीही सोन्याचे भाव 48 हजार रुपयांपार!

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या दरात (Gold Rate on MCX) 62.00 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे. बुधवारी सोन्याचे दर 0.13 टक्क्यांनी कमी होऊन 48,225.00 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत

    मुंबई, 10 नोव्हेंबर: सध्या देशभरात सणासुदीचा काळ सुरू आहे. दिवाळी संपल्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये छठ पूजा साजरी (Chhath puja 2021) केली जाते. या काळातही सोनेखरेदी शुभ मानली जाते. दरम्यान तुम्ही देखील या दरम्यान सोनेखरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. या दिवसांत सोन्याच्या किंमतीत (Gold price today) घसरण पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या दरात (Gold Rate on MCX) 62.00 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे. बुधवारी सोन्याचे दर 0.13 टक्क्यांनी कमी होऊन 48,225.00 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरू आहे. दरम्यान आज सोन्याचे दर कमी झाले असले तरी चांदी मात्र (Silver Rates Today) आज वधारली आहे. चांदीच्या दरात एमसीएक्सवर (Silver Price on MCX) 236 रुपयांची वाढ झाली आहे. आज याठिकाणी चांदीचा दर 64,806.00 रुपये प्रति किलो आहे. हे वाचा-14,500 रुपयांची गुंतवणूक करून उभा करा 23 कोटींचा फंड, वाचा सविस्तर मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. हे वाचा-आज पेट्रोल-डिझेल दरवाढीला लगाम लागला आहे का? काय आहे आजचा भाव अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, The gold

    पुढील बातम्या