मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Goodfellows: रतन टाटांनी पुणेकर तरुण दोस्ताच्या नव्या Startup मध्ये केली गुंतवणूक, ज्येष्ठांना 'कंपनी' देणारी कंपनी

Goodfellows: रतन टाटांनी पुणेकर तरुण दोस्ताच्या नव्या Startup मध्ये केली गुंतवणूक, ज्येष्ठांना 'कंपनी' देणारी कंपनी

मूळचा पुणेकर तरुण शांतनु नायडू याने Goodfellows नावाचा startup सुरू केला आहे. ज्येष्ठांना 'कंपनी' देणारी ही कंपनी असेल. रतन टाटा यांनी यात गुंतवणूक केली आहे.

मूळचा पुणेकर तरुण शांतनु नायडू याने Goodfellows नावाचा startup सुरू केला आहे. ज्येष्ठांना 'कंपनी' देणारी ही कंपनी असेल. रतन टाटा यांनी यात गुंतवणूक केली आहे.

मूळचा पुणेकर तरुण शांतनु नायडू याने Goodfellows नावाचा startup सुरू केला आहे. ज्येष्ठांना 'कंपनी' देणारी ही कंपनी असेल. रतन टाटा यांनी यात गुंतवणूक केली आहे.

मुंबई, 16 ऑगस्ट: रतन टाटा त्यांच्या 28 वर्षांच्या पुणेकर सहकाऱ्यावर फारच खूश आहेत. त्यांनी वाढदिवसही या शांतनु नायडू नावाच्या तरुणाबरोबर साजरा केला होता. त्या वेळचा VIDEO VIRAL झाला होता, तोही तुम्ही पाहिला असेल. आता या आपल्या तरुण दोस्ताच्या कोऱ्या करकरीत start-up ला थेट टाटांकडून फंडिंग मिळालं आहे. Goodfellows (https://www.thegoodfellows.in) या नव्या स्टार्टअपमध्ये टाटांनी गुंतवणूक केली आहे. या सेवा कंपनीचं लाँचिंग 16 ऑगस्टला झालं. ज्येष्ठांना 'कंपनी' देणाऱ्या तरुण फौजेची ही कंपनी आहे. ज्येष्ठ नागरिक आणि युवा पदवीधरांची गाठ घालून देत त्यांच्यामध्ये अर्थपूर्ण मैत्री निर्माण करण्यासाठी Goodfellows हे स्टार्ट-अप सुरू झालं आहे.  इमेरिटस ऑफ टाटा सन्स, श्री. रतन टाटा यांनी या नव्या कंपनीला बीजभांडवल पुरवलं आहे. गुडफेलोज”या युवा स्टार्ट-अपचा शुभारंभ सोहळा आज श्री. रतन टाटा यांच्या उपस्थितीत पार पडला. अभिनेत्री श्रिया पिळगावकर, कन्टेण्ट क्रिएटर विराज घेलानी यांनी आपल्या आजी-आजोबांबरोबर आणि या सेवेसाठी नावनोंदणी केलेल्या विद्यमान ‘ग्रॅण्डपाल्स’च्या साथीने उद्घाटनाचा हा सोहळा साजरा केला. आजी-आजोबांशी ऋणानुबंध तयार करणारी सेवा असं या नव्या स्टार्टअपचं स्वरूप आहे. या स्टार्ट-अपमधील गुंतवणुकीविषयी बोलताना इमेरिटस ऑफ द इन्व्हेस्टमेंटचे अध्यक्ष श्री. रतन एन. टाटा म्हणाले, “गुडफेलोजने दोन पिढ्यांमध्ये निर्माण केलेला स्नेहबंध अतिशय अर्थपूर्ण आहे आणि भारतातील एक महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नावर उत्तर शोधण्यास त्यामुळे मदत होत आहे. या गुंतवणुकीमुळे गुडफेलोजची युवा टीम आणखी विस्तारण्यास मदत होईल, अशी मला आशा आहे. " Investment Tips: काय आहे राकेश झुनझुनवालांच्या यशाचे रहस्य? गुंतवणुकीचे हे 5 नियम पाळाल तर व्हाल श्रीमंत गुडफेलोजची ही  सेवा सध्या मुंबईमध्ये उपलब्ध होणार आहे. यानंतर पुणे, चेन्नई आणि बेंगळुरू या शहरांमध्येही सुर होईल. आता या सेवेसाठी नावनोंदणी खुली आहे. गुडफेलोजमध्ये रुजू होण्यास इच्छुक असलेल्या ८०० हून अधिक युवा पदवीधरांचे अर्ज कंपनीकडे आले, ज्यातून निवडण्यात आलेल्या 20 जणांच्या तुकडीने मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना सोबत केली. ज्येष्ठ नागरिकांना thegoodfellows.in येथे साइन-अप करून किंवा ८७७९५२४३०७ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन ही सेवा मिळविता येईल. “गुडफेलोज”चे ग्रॅण्डपाल्स अर्थात आजी-आजोबांशी तयार होणारे ऋणानुबंध केवळ दिखाव्यापुरते नाहीत तर खरोखरीचे आणि अर्थपूर्ण असावेत याची खबरदारी घेणे आव्हानात्मक पण तितकेच समाधानकारक होते असे कंपनीच्या टीमचे म्हणणे आहे. यासाठी सर्वोत्तम पदवीधर निवडण्यासाठी तपासणीच्या अनेक फे-या तसेच कंपनीतर्फे घेण्यात येणा-या काही सायकोमेट्रिक चाचण्या गरजेच्या असतात. गुडफेलोजद्वारे दिल्या जाणा-या सेवांबद्दल सांगायचे तर एखाद्या नातवंडाकडून केल्या जातील अशा सर्व गोष्टींचा त्यात समावेश आहे. भारतामध्ये जवळ-जवळ १.५ कोटी ज्येष्ठ नागरिक एकतर जोडीदार गमावल्याने किंवा नोकरीच्या अटळ गरजेपोटी कुटुंब इतरत्र स्थलांतरीत झाल्याने एकट्याने आयुष्य कंठत आहेत. यातील अनेकजणांपाशी काळजीवाहू व्यक्ती आहेत किंवा ई-कॉमर्ससारख्या उपयुक्ततेशी निगडित गरजा पूर्ण करणा-या स्टार्ट-अप कंपन्या आहेत, पण त्यांच्या ढासळत्या मनोकायिक आरोग्याला एकटेपणा, सोबतीचा अभाव हे घटक प्रामुख्याने जबाबदार आहेत. कोण आहे शांतनु नायडू? रतन टाटा आपली खासगी गुंतवणूक ज्या स्टार्टअप (Startups) कंपन्यांमध्ये करतात त्यांची निवड करताना ते या तरुणाचा सल्ला घेतात. शंतनू नायडू (Shantanu Naidu) असं या तरुणाचं नाव आहे. मूळचा पुणेकर शांतनु आता टाटांच्या पर्सनल कार्यालयाचा तो आता जनरल मॅनेजरही आहे. श्वान प्रेमामुळे टाटांच्या नजरेत भरला शंतनू  शंतनूची मोटोपॉज नावाची कंपनी आहे. जी कुत्र्यांच्या गळपट्ट्याच्या कॉलरचं डिझाइन तयार करते. हे पट्टे रात्री चमकतात. मोटोपॉजचा व्यवसाय चार देशांतील 20हून अधिक शहरांत सुरू आहे. याचबरोबर शंतनू इन्स्टाग्राम हँडल ‘ऑन यूवर स्पार्क्स’ वरून लाइव्ह प्रोग्रॅम करतो. आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून शंतनूने रतन टाटा यांना पत्र लिहिलं त्यामुळे टाटांना भेटण्याचं आमंत्रण शांतनूला मिळालं. शांतनूच्या कुटुंबातील पाचव्या पिढीतील व्यक्ती टाटा ग्रुपमध्ये (Tata Group) नोकरी करत आहे. टाटांशी झालेल्या भेटीत त्यांनी भटक्या कुत्र्यांच्या प्रकल्पात आर्थिक मदतीची तयारी दाखवली पण शांतनूने ती नाकारली. टाटांनी शंतनूच्या स्टार्टअपमध्ये काही रक्कम गुंतवली त्यामुळे त्याची कंपनी 11 शहरांत पोहोचली. त्यानिमित्ताने शंतनूची टाटांशी वारंवार भेट होऊ लागली. वाचा -  28 वर्षाच्या शंतनूकडून रतन टाटाही घेतात सल्ला, दोघांमध्ये 'ही' गोष्ट आहे समान कॉर्नेलमधून एमबीए करण्यासंबंधी आपला विचार शंतनूने टाटांना सांगितला. त्याला कॉर्नेलमध्ये प्रवेशही मिळाला होता. या काळात तो सतत उद्योजकता, गुंतवणूक, नव्या स्टार्टअप कल्पना याबद्दलच विचार करत होता. त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यावर टाटांनी त्याला आपल्या ऑफिसात (Ratan Tata’s Office) नोकरी करण्याचं आमंत्रण दिलं. Goodfellows बद्दल बोलताना शंतनू नायडू म्हणाले, “सोबतीची व्याख्या ही वेगवेगळ्या माणसांसाठी वेगवेगळी असते या गोष्टीवर या स्टार्ट-अपने भर दिला आहे. काहींसाठी त्याचा अर्थ एकत्र बसून चित्रपट पाहणे असा असतो, काहींसाठी जुन्या दिवसांतल्या आठवणी सांगत बसणे, चालायला जाणे म्हणजे सोबत असते तर काही जणांना अगदी काही न करता केवळ सोबत कुणाचातरी वावर असणे पुरेसे असते आणि आम्ही या सर्व गरजा लक्षात घेतो. गुडफेलोजबरोबर या ग्रॅण्डपाल्सचे ऋणानुबंध किती स्वाभाविकपणे साकारत गेले हे आम्ही बीटा चाचण्यांमध्ये पाहिले. श्री. टाटा यांनी आमच्या या व्यवसायामध्ये केलेली गुंतवणूक म्हणजे या संकल्पनेप्रती असलेल्या आमच्या बांधिलकीला मिळालेले प्रचंड मोठे प्रोत्साहन आहे.”
First published:

Tags: Pune, Ratan tata, Startup

पुढील बातम्या