Home /News /money /

28 वर्षाच्या शंतनूकडून रतन टाटाही घेतात सल्ला, दोघांमध्ये 'ही' गोष्ट आहे समान

28 वर्षाच्या शंतनूकडून रतन टाटाही घेतात सल्ला, दोघांमध्ये 'ही' गोष्ट आहे समान

रतन टाटा आपली खासगी गुंतवणूक ज्या स्टार्टअप (Startups) कंपन्यांमध्ये करतात त्यांची निवड करताना ते या तरुणाचा सल्ला घेतात. शंतनू नायडू (Shantanu Naidu) असं या तरुणाचं नाव आहे.

नवी दिल्ली 11 जून : तुम्हाला जर असं सांगितलं की एक 28 वर्षांचा तरुण आहे ज्याचा सल्ला टाटा ग्रुपचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटाही (Ratan Tata) घेतात, तर तुमचा विश्वास बसेल का? कदाचित नाही. पण रतन टाटा आपली खासगी गुंतवणूक ज्या स्टार्टअप (Startups) कंपन्यांमध्ये करतात त्यांची निवड करताना ते या तरुणाचा सल्ला घेतात. शंतनू नायडू (Shantanu Naidu) असं या तरुणाचं नाव आहे. आज जाणून घेऊया या शांतनूची कहाणी... शांतनू करतो स्टार्टअप्सना मदत शंतनूची मोटोपॉज नावाची कंपनी आहे. जी कुत्र्यांच्या गळपट्ट्याच्या कॉलरचं डिझाइन तयार करते. हे पट्टे रात्री चमकतात. मोटोपॉजचा व्यवसाय चार देशांतील 20हून अधिक शहरांत सुरू आहे. याचबरोबर शंतनू इन्स्टाग्राम हँडल ‘ऑन यूवर स्पार्क्स’ वरून लाइव्ह प्रोग्रॅम करतो. त्याच्या वेबिनारसाठी प्रत्येकी 500 रुपये फी घेतो. श्वान प्रेमामुळे टाटांच्या नजरेत भरला शंतनू  शंतनू म्हणाला, ‘ रस्त्यांवरील भरधाव वेगातील गाड्यांच्या खाली सापडून अनेक कुत्र्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना मी पाहिल्या. त्यामुळे मनाला खूप वेदना झाली. त्याचं कारण शोधलं तर लक्षात आलं की वाहनाच्या ड्रायव्हरला कुत्रा रस्त्यामध्ये आल्याचं दिसलं नाही, त्यामुळे त्या कुत्र्याचा मृत्यू झाला. त्यामुळे मला कुत्र्यांसाठी कॉलर रिफ्लेक्टर तयार करण्याची कल्पना सुचली. त्याने मोटोपॉज (Motopaws) नावाने कुत्र्यांसाठी कॉलर तयार केली. ही कॉलर रिफ्लेक्टर (Collar reflector) असल्याने रात्री रस्त्यांवर लाइट नसले तरीही ड्रायव्हर या कुत्र्यांना पाहू शकतात त्यामुळे भटक्या कुत्र्यांचे जीव वाचत आहेत.’ या छोट्या पण महत्त्वाच्या कामाबद्दल टाटा समूहातील कंपनीच्या न्यूजलेटरमध्ये माहिती छापून आली आणि रतन टाटांनी ती वाचली. त्यांनाही श्वान फार आवडतात. त्यामुळे त्यांना शांतनूबद्दल कळालं. वडिलांच्या सांगण्यावरून टाटांना लिहिलं पत्र आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून शंतनूने रतन टाटा यांना पत्र लिहिलं त्यामुळे टाटांना भेटण्याचं आमंत्रण शांतनूला मिळालं. शांतनूच्या कुटुंबातील पाचव्या पिढीतील व्यक्ती टाटा ग्रुपमध्ये (Tata Group) नोकरी करत आहे. टाटांशी झालेल्या भेटीत त्यांनी भटक्या कुत्र्यांच्या प्रकल्पात आर्थिक मदतीची तयारी दाखवली पण शांतनूने ती नाकारली. टाटांनी शंतनूच्या स्टार्टअपमध्ये काही रक्कम गुंतवली त्यामुळे त्याची कंपनी 11 शहरांत पोहोचली. त्यानिमित्ताने शंतनूची टाटांशी वारंवार भेट होऊ लागली. Good News: तुमच्या एरियातील कोणत्याही डिस्ट्रिब्यूटरकडून LPG सिलेंडर भरता येणार 2018 मध्ये मिळालं टाटांच्या ऑफिसात कामाचं आमंत्रण कॉर्नेलमधून एमबीए करण्यासंबंधी आपला विचार शंतनूने टाटांना सांगितला. त्याला कॉर्नेलमध्ये प्रवेशही मिळाला होता. या काळात तो सतत उद्योजकता, गुंतवणूक, नव्या स्टार्टअप कल्पना याबद्दलच विचार करत होता. त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यावर टाटांनी त्याला आपल्या ऑफिसात (Ratan Tata’s Office) नोकरी करण्याचं आमंत्रण दिलं. शंतनू म्हणाला, ‘ टाटांसोबत काम करण्याची संधी मिळणं ही खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे. अशी संधी आयुष्यात एकदाच मिळते. त्यांच्यासोबत असताना प्रत्येक मिनिटाला काही ना काही नवं शिकायला मिळतं. जनरेशन गॅप कधीच जाणवत नाही. आपण रतन टाटांसोबत काम करत आहोत याची जाणीव ते आपल्याला अजिबात होऊच देत नाहीत.’ स्टार्टअप्सला मिळतो टाटांच्या अनुभवाचा फायदा 81 वर्षांच्या रतन टाटा यांचा देशातील स्टार्टअप इकोसिस्टिमवर प्रचंड विश्वास आहे. टाटांची खासगी गुंतवणूक करणारी कंपनी आरएनटी असोसिएट्स आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया ऑफ द रिजेंट्सने जून 2016 मध्ये करार केला होता. त्यातून भारतासाठी यूसी-आरएनटी फंड्स या उपक्रमाअंतर्गत स्टार्टअप, नव्या कंपन्यांना आर्थिक मदत केली जाते. रतन टाटांच्या गुंतवणुकीबद्दल माहिती जाहीर केलेली नसते पण ते ज्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करतात यातून त्यांना त्यांच्या अनुभवाचा खजिना मिळतो.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Ratan tata, Start business

पुढील बातम्या