जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Rakesh Jhunjhunwala यांनी 'या' बँकेत वाढवली आपली हिस्सेदारी; वर्षभरात आधीच दिलाय 70 टक्के परतावा

Rakesh Jhunjhunwala यांनी 'या' बँकेत वाढवली आपली हिस्सेदारी; वर्षभरात आधीच दिलाय 70 टक्के परतावा

Rakesh Jhunjhunwala यांनी 'या' बँकेत वाढवली आपली हिस्सेदारी; वर्षभरात आधीच दिलाय 70 टक्के परतावा

शेवटच्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर-डिसेंबर 2021 मध्ये Rakesh Jhunjhunwala यांची कॅनरा बँकेतील होल्डिंग 1.6 टक्के होती. अशा प्रकारे, झुनझुनवाला यांची कॅनरा बँकेतील भागीदारी तिमाही आधारावर 0.36 टक्क्यांनी वाढली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 एप्रिल : जागतिक संकेतांमुळे FY22 च्या चौथ्या तिमाहीत शेअर बाजार (Share Market) अस्थिर राहिला. यावेळी दिग्गज गुंतवणूकदारांपैकी एक राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी या तिमाहीत बंगळुरूतील कॅनरा बँकेत (Canara Bank) आपला हिस्सा वाढवला आहे. ही भारत सरकारच्या मालकीची देशातील तिसरी राष्ट्रीयीकृत बँक आहे. राकेश झुनझुनवाला यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कॅनरा बँकेच्या स्टॉकचा त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये (Rakesh Jhunjhunwla’s Portfolio) समावेश केला होता. तेव्हापासून ते तेजीच्या शक्यता लक्षात घेऊन बँकेतील आपली हिस्सेदारी वाढवत आहेत. मार्च तिमाहीत शेअर वाढले मार्च 2022 पर्यंत, राकेश झुनझुनवाला यांनी कॅनरा बँकेतील त्यांचा हिस्सा 35,597,400 इक्विटी शेअर्स किंवा 1.96 टक्के वाढवला आहे. शेवटच्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर-डिसेंबर 2021 मध्ये झुनझुनवाला यांची कॅनरा बँकेतील होल्डिंग 1.6 टक्के होती. अशा प्रकारे, झुनझुनवाला यांची कॅनरा बँकेतील भागीदारी तिमाही आधारावर 0.36 टक्क्यांनी वाढली आहे. SBI ने ग्राहकांना केलं सावध; ऑनलाईन फसवणुकीपासून बचावासाठी दिल्या खास टिप्स एका वर्षात 70 टक्के परतावा शुक्रवारी कॅनरा बँकेचा शेअर बीएसईवर 0.63 टक्क्यांनी वाढून 248.30 रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या किमतीनुसार बँकेचे मूल्यांकन 45,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कॅनरा बँकेच्या शेअर्सनी एका वर्षात सुमारे 70 टक्के मजबूत परतावा दिला आहे. गेल्या वर्षी 8 एप्रिल रोजी बँकेचा शेअर 147.2 रुपये होता. नॅशनल पेन्शन स्कीममध्ये लोकांचा कल वाढला; वर्षभरात वाढले एक कोटी ग्राहक, तुम्हीही केली का गुंतवणूक? डिसेंबर तिमाहीचे निकाल चांगले डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत, बँकेचे निकाल खूप चांगले होते. कॅनरा बँकेचा नफा डिसेंबर तिमाहीत वार्षिक 115 टक्क्यांनी वाढून 1502 कोटी झाला आहे, जो मागील वर्षीच्या तिमाहीत 696.1 कोटी होता. कॅनरा बँकेचे व्याज उत्पन्न वार्षिक 14.1 टक्क्यांनी वाढून 6945 कोटी रुपये झाले आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत बँकेचे व्याज उत्पन्न 6086.5 कोटी रुपये होते. तिमाही आधारावर, बँकेची तरतूद 3,360 कोटी रुपयांवरून 2,245 कोटी रुपयांवर आली आहे. लाइव्हमिंटच्या अहवालानुसार, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, बाजाराची नजर आता चौथ्या तिमाहीच्या निकालाकडे आहे, जी पुढील आठवड्यात आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या निकालांनी सुरू होईल. क्रेडिट ग्रोथ आणि बॅलेन्शशीट सुधारणा यामुळे बँकिंग क्षेत्राचा आऊटलूक पूर्वीपेक्षा चांगला आहे. दुसरीकडे, सीजनल कमजोरीमुळे, आयटी क्षेत्रासाठी संमिश्र आऊटलूक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात