मराठी बातम्या /बातम्या /मनी /

नॅशनल पेन्शन स्कीममध्ये लोकांचा कल वाढला; वर्षभरात वाढले एक कोटी ग्राहक, तुम्हीही केली का गुंतवणूक?

नॅशनल पेन्शन स्कीममध्ये लोकांचा कल वाढला; वर्षभरात वाढले एक कोटी ग्राहक, तुम्हीही केली का गुंतवणूक?

NPS ची सुरुवात 2004 साली झाली. यापूर्वी केवळ सरकारी कर्मचारीच यामध्ये गुंतवणूक करू शकत होते, परंतु 2009 मध्ये ते सर्वांसाठी खुले करण्यात आले.

NPS ची सुरुवात 2004 साली झाली. यापूर्वी केवळ सरकारी कर्मचारीच यामध्ये गुंतवणूक करू शकत होते, परंतु 2009 मध्ये ते सर्वांसाठी खुले करण्यात आले.

NPS ची सुरुवात 2004 साली झाली. यापूर्वी केवळ सरकारी कर्मचारीच यामध्ये गुंतवणूक करू शकत होते, परंतु 2009 मध्ये ते सर्वांसाठी खुले करण्यात आले.

    मुंबई, 9 एप्रिल : नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) मध्ये देशातील लोकांचा कल वाढत आहे. यामुळेच सेवानिवृत्ती निधी (Pension Fund) बनवणाऱ्या या योजनेतील गुंतवणूक वाढत आहे. गेल्या एका वर्षात एनपीएसच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सुमारे 1 कोटींनी वाढली आहे. अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक वाढली आहे. निवृत्ती निधी उभारण्यासाठी NPS हा सर्वाधिक पसंतीचा पर्याय बनत आहे. ही योजना पेंशन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंटद्वारे चालवली जाते. ग्राहकांची संख्या 5 कोटींच्या पुढे वित्त मंत्रालयाने शुक्रवारी दिलेल्या माहितीत, मार्च 2022 मध्ये राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या ग्राहकांची संख्या 5.20 कोटींवर पोहोचल्याचे सांगण्यात आले. मार्च 2021 मध्ये त्याचे 4.24 कोटी ग्राहक होते. म्हणजेच एका वर्षात 96 लाख ग्राहक त्याच्याशी जोडले गेले आहेत. वार्षिक आधारावर NPS च्या विविध योजनांमध्ये सामील होणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत 22.58 टक्के वाढ झाली आहे. Car Loan: कार लोन घेताना 'या' गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा कर्ज डोईजड होईल अटल पेन्शन योजनेचे सर्वाधिक ग्राहक अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मार्च 2022 अखेरपर्यंत अटल पेन्शन योजनेचे (APY) सर्वाधिक ग्राहक होते. अटल पेन्शन योजनेच्या गुंतवणूकदारांची संख्या 3.62 कोटी झाली आहे. 31 मार्च 2022 पर्यंत, अटल पेन्शन योजनेअंतर्गत एकूण 7,36,592 कोटी रुपयांची पेन्शन मालमत्ता व्यवस्थापनाखाली होती. राज्य सरकारचे 55.77 लाख कर्मचारी आणि केंद्र सरकारचे 22.84 लाख कर्मचारी NPS च्या विविध योजनांशी संबंधित आहेत. 14.04 लाख खाजगी कंपन्या आणि 22.92 लाख सामान्य लोक राष्ट्रीय पेन्शन प्रणालीच्या विविध योजनांचे सदस्य आहेत. Bonus Offer: कर्मचाऱ्यांना निरोगी ठेवण्यासाठी कंपनीची अनोखी शक्कल, 'ही' अट पूर्ण करणाऱ्यांना मिळणार बोनस NPS म्हणजे काय? NPS ची सुरुवात 2004 साली झाली. यापूर्वी केवळ सरकारी कर्मचारीच यामध्ये गुंतवणूक करू शकत होते, परंतु 2009 मध्ये ते सर्वांसाठी खुले करण्यात आले. यामध्ये, गुंतवणूकदार 60 वर्षांचे झाल्यावर जमा झालेल्या रकमेचा काही भाग एकरकमी काढू शकतो आणि उर्वरित रकमेतून नियमित पेन्शन मिळते. NPS मध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळतो, तर कर सूट देखील उपलब्ध आहे. अटल पेन्शन योजना काय आहे? अटल पेन्शन योजना ही भारतातील नागरिकांसाठी हमी दिलेली पेन्शन योजना आहे. ही योजना 9 मे 2015 रोजी लाँच करण्यात आली. तुम्ही जितक्या कमी वयात या योजनेत सामील व्हाल तितका तुम्हाला फायदा जास्त होईल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money

    पुढील बातम्या