मराठी बातम्या /बातम्या /मनी /'या' शेअरमधून गुंतवणूकदारांना वर्षभरात 168 टक्के रिटर्न्स, अजूनही गुंतवणुकीची संधी

'या' शेअरमधून गुंतवणूकदारांना वर्षभरात 168 टक्के रिटर्न्स, अजूनही गुंतवणुकीची संधी

गेल्या वर्षी 20 ऑक्टोबर रोजी zensar technologies या शेअरची किंमत 190.90 रुपये होती जी 320.85 रुपयांनी वाढून 511.75 रुपयांवर ट्रेड करत आहे.

गेल्या वर्षी 20 ऑक्टोबर रोजी zensar technologies या शेअरची किंमत 190.90 रुपये होती जी 320.85 रुपयांनी वाढून 511.75 रुपयांवर ट्रेड करत आहे.

गेल्या वर्षी 20 ऑक्टोबर रोजी zensar technologies या शेअरची किंमत 190.90 रुपये होती जी 320.85 रुपयांनी वाढून 511.75 रुपयांवर ट्रेड करत आहे.

मुंबई, 19 ऑक्टोबर : शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी चांगला स्टॉक सिलेक्ट करणे मोठा टास्क असतो. काही शेअर तर असे असतात ज्यांचा आपण कधीही विचार केलेला नसतो. झेंसार टेक्नॉलॉजीजच्या (Zensar Technologies) शेअर्सनेही वर्षभरात चांगली कामगिरी केली आहे. एका वर्षाच्या कालावधीत झेंसार टेक्नॉलॉजीसच्या शेअर्समध्ये 168 टक्के वाढ झाली आहे. तर यावर्षी YTD वाढ 113 टक्के झाली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला सुमारे 242 रुपयांवर असलेला हा शेअर सध्या 511 रुपयांच्या जवळ ट्रेड करत आहे.

झेंसार टेक्नॉलॉजीज शेअरच्या वर्षभराच्या कामगिरीवर नजर टाकली तर या शेअरमध्ये 168.07 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. 20 ऑक्टोबर 2020 रोजी हा शेअर 190.90 रुपयांवर होता. जो 320 रुपयांनी वाढून 511 रुपयांवर आहे.  तर सहा महिन्याचा ग्राफ पाहिल तर सहा महिन्यात या शेअरमध्ये 92.68 टक्क्यांची वाढ झाली आहे. हा शेअर सहा महिन्यांपूर्वी 20 एप्रिल रोजी 265.60 रुपयांवर ट्रेड करत होता.

सेक्युलर अपट्रेंड दरम्यान आयटी इंडेक्सने सुटकेचा श्वास घेतला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने अलीकडेच म्हटलं होतं की, आयटी क्षेत्रात, झेंसार टेक्नॉलॉजीचे शेअर्स सातत्याने तेजीत आहेत आणि 50 दिवसांच्या EMA (Exponential Moving Average) च्या वर ट्रेड करत आहे.

ब्रोकरेजचे म्हणणं आहे की, आयटी क्षेत्रातील रिबाउंड ट्रॅक्शनमुळे स्टॉक हळूहळू 595 रुपयांच्या लक्ष्याकडे जाण्यास मदत करेल, कारण हा स्टॉक ऑल टाईम हायच्या जवळ आहे. 595 रुपयांच्या टार्गेट प्राईजसह या शेअरला तीन महिन्यांच्या कालावधीसह 468 रुपयांचा स्टॉप लॉस ब्रोकरेजकडून देण्यात आला आहे.

गेल्या तीन आठवड्यांत, स्टॉकने धीम्या गतीने रिट्रेसमेंट केले आहे, ज्यामध्ये त्याने मागील दोन आठवड्यांच्या रॅलीच्या 80 टक्क्यांना मागे घेतले आहे. हे या शेअरची मजबूत प्राईज स्ट्रक्चर दर्शवते. त्यामुळे पुढील रेंजसाठी हे चांगले संकते आहेत.

झेंसार टेक्नॉलॉजीज हाय-टेक, मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल आणि बीएफएसआयला अॅप्लिकेशन आणि आयएमएस सेवा पुरवते. गेल्या काही वर्षात हे ऑर्गेनिक आणि इनऑर्गेनिक स्वरुपात विकसित झाले आहे. ही कंपनी कर्जमुक्त आहे आणि हेल्दी डबल डिजिट रिटर्न रेश्योसह कंपनी चांगली परफॉर्म करत आहे.

First published:
top videos

    Tags: Investment, Money, Share market, Stock Markets