मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओतील या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओतील या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

या आयटी कंपनीचा शेअर मंगळवारी बीएसईवर 9 टक्के तेजीसह 407 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या तेरा वर्षातील ही या शेअरची सर्वोच्च लेव्हल आहे. हा शेअर आहे आयटी कंपनी अॅप्टेकचा (Aptech Share Price).

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर: कोरोना काळात आयटी कंपन्यांनी शेअर मार्केटमध्ये (IT Companies Share Market) वर्चस्व प्रस्थापित केले आहे. शिवाय आयटी कंपन्यांच्या स्टॉक्सनी (IT Companies Share Return) चांगला रिटर्न दिला आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर आयटी कंपन्यांच्या शेअरमुळे गुंतवणूकदारांची कमी निराशा झाली आहे. अशाच एका आयटी कंपनीचा शेअर मंगळवारी बीएसईवर 9 टक्के तेजीसह 407 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या तेरा वर्षातील ही या शेअरची सर्वोच्च लेव्हल आहे. हा शेअर आहे आयटी कंपनी अॅप्टेकचा (Aptech Share Price). आज मात्र या शेअरच्या किंमतीत घसरण झाली आहे. आज बुधवारी हा शेअर दुपारी 12.30 च्या सुमारास 1.55 टक्के घसरणीनंतर 391.35 रुपयांवर व्यवहार करत आहे.

झुनझनवाला यांची 23.72 टक्के भागीदारी

राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतील शेअरने मंगळवारी तेरा वर्षांचा उच्चांक गाठल्याने, ज्यांनी हा स्टॉक विकत घेतला आहे त्यांची चांदी झाली आहे. BSE कडून मिळालेल्या माहितीनुसार दिग्गज गुंतवणूकदार  राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala Portfolio) यांची Aptech मध्ये 12.50 टक्के भागीदारी आहे. तर त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांची देखील या आयटी कंपनीत  11.22 टक्क्यांची भागीदारी आहे. अर्थात झुनझुनवाला यांच्याकडे या कंपनीचे एकूण 23.72 टक्के शेअर्स आहेत.

हे वाचा-डिसेंबर ते फेब्रुवारी 2022 पर्यंत महाराष्ट्रासह या राज्यांतील अनेक ट्रेन्स रद्द

मीडिया रिपोर्ट्सनुसार, Aptech चा शेअर जानेवारी 2008 नंतर उच्च पातळीवर ट्रेडिंग करत आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये तो 403.95 रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता. 11 डिसेंबर 2007 रोजी या शेअरने 449 रुपयांचा उच्चांक गाठला. गेल्या 6 महिन्यांतील व्यवहार पाहता या शेअरची किंमत 102 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांना मोठा फायदा झाला आहे.

अॅप्टेक बोर्डाची उद्या अर्थात 11 नोव्हेंबर बैठक होणार आहे, ज्यामध्ये आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीच्या निर्णयांना मंजुरी दिली जाईल.

First published:

Tags: Investment, Money, Money matters, Share market