जाहिरात
मराठी बातम्या / मनी / राकेश झुनझुनवाला यांचं दोन शेअरमुळे मोठं नुकसान; शेअर बाजारातील पडझडीत 866 कोटींचा फटका

राकेश झुनझुनवाला यांचं दोन शेअरमुळे मोठं नुकसान; शेअर बाजारातील पडझडीत 866 कोटींचा फटका

राकेश झुनझुनवाला यांचं दोन शेअरमुळे मोठं नुकसान; शेअर बाजारातील पडझडीत 866 कोटींचा फटका

टायटनचे शेअर्स 6.09 टक्क्यांनी घसरले, तर स्टार हेल्थचे शेअर 4.54 टक्क्यांनी घसरले. आज या दोन शेअर्सच्या घसरणीमुळे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांना 8,666,527,875.25 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 जून : भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी 17 जून रोजी देखील घसरण पाहायला मिळाली. बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या टायटन (Titan Share) आणि स्टार हेल्थचे (Star Health) शेअर काल घसरले. टायटनचे शेअर्स 6.09 टक्क्यांनी घसरले, तर स्टार हेल्थचे शेअर 4.54 टक्क्यांनी घसरले. आज या दोन शेअर्सच्या घसरणीमुळे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांना 8,666,527,875.25 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून टायटन आणि स्टार हेल्थच्या शेअर्सवर विक्रीचे वर्चस्व आहे. टायटनचा स्टॉक 2022 मध्ये आतापर्यंत 23 टक्क्यांनी घसरला आहे. टाटा समूहाचा हा हिस्सा गेल्या सहा महिन्यांत 13.57 टक्क्यांनी घसरला आहे, तर टायटनचा शेअर गेल्या एका महिन्यात 10.67 टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या पाच व्यापार सत्रांमध्ये हा समभाग लाल चिन्हात व्यवहार करत असून आठ टक्क्यांनी घसरला आहे. काल तो 6.09 टक्क्यांनी घसरून 1935.45 रुपये (Titan Share Price) वर बंद झाला आहे. Post Office मध्ये गुंतवणुकीचे पर्याय, पैसे सुरक्षित राहतील आणि बँकेहून अधिक परतावा मिळेल स्टार हेल्थच्या स्टॉकमध्ये घसरण सुरूच स्टार हेल्थच्या स्टॉकची स्थितीही चांगली नाही. गेल्या पाच व्यापार सत्रांमध्येच तो आठ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. गेल्या सहा महिन्यांत त्यात 20 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. 2022 मध्ये आतापर्यंत गुंतवणूकदारांचे 18.67 नुकसान झाले आहे. शुक्रवारीही हा शेअर 4.54 टक्क्यांनी घसरला आणि 634 रुपयांवर बंद झाला. बँकांच्या वसुली एंजट्सना लगाम लागणार; RBI गर्व्हनर शक्तीकांत दास यांची कठोर भूमिका राकेश झुनझुनवाला याला 866 कोटींचा फटका राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे मार्चच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार टायटन कंपनीचे एकूण 4,48,50,970 शेअर्स आहेत. आज टायटनचा शेअर 125.5 रुपयांनी घसरला आहे. यामुळे झुनझुनवाला यांचे टायटनच्या शेअर्समध्ये 5,628,796,735 रुपये (4,48,50,970 x 125.5 रुपये) कमी झाले. बिग बुलकडे स्टार हेल्थचे एकूण 10,07,53,935 शेअर्स आहेत. आज जर प्रत्येक शेअरमध्ये 30.15 रुपयांची घसरण जोडली गेली, तर आज या शेअरमध्ये राकेश झुनझुनवाला यांना 3,037,731,140.25 रुपयांचे (30.10 x 10,07,53,935 रुपये) नुकसान झाले आहे. अशाप्रकारे, आज टायटन आणि स्टार हेल्थच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यामुळे झुनझुनवाला यांच्या संपत्तीत 8,666,527,875.25 रुपयांची घट झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात