जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Post Office मध्ये गुंतवणुकीचे पर्याय, पैसे सुरक्षित राहतील आणि बँकेहून अधिक परतावा मिळेल

Post Office मध्ये गुंतवणुकीचे पर्याय, पैसे सुरक्षित राहतील आणि बँकेहून अधिक परतावा मिळेल

Post Office मध्ये गुंतवणुकीचे पर्याय, पैसे सुरक्षित राहतील आणि बँकेहून अधिक परतावा मिळेल

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट अकाऊंट, पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट अकाऊंट (POTD) आणि पोस्ट ऑफिस – राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) या योजनांमध्ये पाच वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 जून : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता आहे. अशा परिस्थितीत, अनेकांना धोकादायक इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणे आवडत नाही. अशा लोकांसाठी पोस्ट ऑफिस (Post Office) उत्तम गुंतवणुकीचे पर्याय देते. पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला दीर्घ मुदतीत (Long term) जास्त परतावा मिळतो. पोस्टाच्य तीन बचत योजनांबद्दल माहिती घेऊ ज्यात हमखास परतावा मिळतो. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट अकाऊंट, पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट अकाऊंट (POTD) आणि पोस्ट ऑफिस – राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) या योजनांमध्ये पाच वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिसच्या या बचत योजनांमध्ये पैसे गुंतवण्याचे अनेक फायदे आहेत. येथे तुम्हाला परताव्याची हमी आहे. योजनेत गुंतवणूक करणे देखील सुरक्षित आहे, कारण या योजनांना पोस्ट ऑफिसचा पाठिंबा आहे. यापैकी दोन योजनांमध्ये कर कपातीचा लाभ देखील आहे. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट अकाउंट (RD) जर तुम्ही सुरक्षित RD पर्याय शोधत असाल, जो हमखास परतावा देतो. तर तुम्ही पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करु शकता. या योजनेत आरडीवर 5.8 टक्के व्याजदर आहे. व्याज दर तिमाही आधारावर चक्रवाढ केला जातो. कोणीही या योजनेत दरमहा 100 रुपये इतक्या कमी रकमेत किंवा 10 रुपयांच्या पटीत गुंतवणूक सुरू करू शकतो. या योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. बँकांच्या वसुली एंजट्सना लगाम लागणार; RBI गर्व्हनर शक्तीकांत दास यांची कठोर भूमिका पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खाते (POTD) नावाप्रमाणेच ही योजना म्हणजे पोस्ट ऑफिसची एक प्रकारची एफडी आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये एक, दोन, तीन किंवा पाच वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. एक, दोन आणि तीन वर्षांसाठी FD वर 5.5 टक्के व्याजदर उपलब्ध आहे. तुम्ही जर चांगला परतावा शोधत असाल, तर तुम्ही पाच वर्षांच्या मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करावी. पाच वर्षांच्या टाइम डिपॉझिट स्कीमवर कमाल 6.7 टक्के व्याज मिळते. याशिवाय, तुम्ही आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत प्राप्तिकर सूटचा लाभ घेऊ शकता. या योजनेअंतर्गत, तुम्ही किमान 1000 रुपये जमा करून खाते उघडू शकता. तुम्ही या योजनेत तुम्हाला पाहिजे तितकी गुंतवणूक 100 च्या पटीत करू शकता. गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. Aadhar Instant Loan: पैशांचे अडचण असेल तर आधार कार्ड करेल मदत; तातडीने लोन घ्या पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) पोस्ट ऑफिसच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेची मुदत पाच वर्षांची असते. ही तिसरी योजना आहे, ज्यामध्ये पाच वर्षांच्या कालावधीत 6.8 टक्के दराने व्याज मिळते. या योजनेंतर्गत, तुम्ही 1000 आणि 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करू शकता. ठेवींसाठी कमाल मर्यादा नाही. या योजनेत तुम्ही पाच वर्षांचा लॉक-इन कालावधी संपल्यानंतरच पैसे काढू शकता. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये, तुम्ही मुदतपूर्तीपूर्वीच गुंतवणूक काढून घेऊ शकता. या योजनेअंतर्गत गुंतवलेल्या रकमेवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कपातीसाठी दावा केला जाऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात