मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Motilal Oswal ची 'या' फर्टिलायझर शेअरला BUY रेटिंग, 40 टक्के परताव्याची शक्यता

Motilal Oswal ची 'या' फर्टिलायझर शेअरला BUY रेटिंग, 40 टक्के परताव्याची शक्यता

मोतीलाल ओसवाल म्हणतात की Coromandel International ची सध्याची किंमत सुमारे 740 रुपये आहे. पुढील 1 वर्षात हा शेअर 40 टक्क्यांच्या उसळीसह 1035 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

मोतीलाल ओसवाल म्हणतात की Coromandel International ची सध्याची किंमत सुमारे 740 रुपये आहे. पुढील 1 वर्षात हा शेअर 40 टक्क्यांच्या उसळीसह 1035 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

मोतीलाल ओसवाल म्हणतात की Coromandel International ची सध्याची किंमत सुमारे 740 रुपये आहे. पुढील 1 वर्षात हा शेअर 40 टक्क्यांच्या उसळीसह 1035 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 17 डिसेंबर : शेअर बाजारात गुंतवणूक (Share market Investment) करताना कोणत्या शेअरमध्ये कधी गुंतवणूक करावी यावर तुमचा फायदा किंवा तोटा अवलंबून असते. शेअर बाजाराची जास्त माहिती नसलेले किंवा किरकोळ गुंतवणूकदार (Retail Investors) अशावेळी मोठे ब्रोकरेज फर्म देत असलेल्या माहितीकडे बारकाईने लक्ष देत असतात. मोतीलाल ओसवाल या ब्रोकरेज फर्मने आज एका फर्टिलायझर शेअरमध्ये (Fertilizer Shares) गुंतवणुकीची शिफारस केली आहे.

देशात कोरोना महामारीच्या (Coronavirus) काळात उत्पादन, वस्त्रोद्योग, पर्यटन या क्षेत्रांना मोठा फटका सहन करावा लागला. अशा परिस्थितीत कृषी क्षेत्र (Agriculture Sector) भारतीय अर्थव्यवस्थेचा (Indian Economy) तारणहार म्हणून उदयास आले. देशातील कृषी क्षेत्राच्या वाढीबरोबरच त्याशी संबंधित क्षेत्रांमध्येही तेजी दिसून आली. यामध्ये कृषी उपकरणे आणि खते यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. अशा स्थितीत देशातील प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी नुकत्याच जारी केलेल्या अहवालात गुंतवणूकदारांना कोरोमंडल इंटरनॅशनल शेअरमध्ये (Coromandel International) गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

फिटनेसवर लक्ष देणाऱ्यांसाठी खास SBI Pulse card; वेलकम बेनिफिट म्हणून 4999 रुपयांचं स्मार्टवॉच फ्री

मोतीलाल ओसवाल यांनी या शेअरला BUY रेटिंग देताना सांगितले आहे की, पुढील 1 वर्षात या स्टॉकमध्ये 40 टक्के परतावा मिळू शकतो. मोतीलाल ओसवाल म्हणतात की Coromandel International ची सध्याची किंमत सुमारे 740 रुपये आहे. पुढील 1 वर्षात हा शेअर 40 टक्क्यांच्या उसळीसह 1035 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

Coromandel International ही एक अॅग्रीसोल्युशन प्रोव्हायडर कंपनी आहे. ही भारतातील सर्वात मोठी खाजगी फॉस्फेटिक फर्टिलायझर कंपनी आहे. याशिवाय ही जगातील सर्वात मोठी कडुलिंब आधारित जैव कीटकनाशक उत्पादक आहे. याशिवाय सेंद्रिय खत निर्मितीत देशातील पहिल्या क्रमांकावर आहे. कंपनीकडे 750 स्टोअर्ससह देशातील सर्वात मोठी कृषी रिटेल चेन आहे.

शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex मध्ये 889 अंकांची पडझड, तर Nifty 17 हजारांच्या खाली

मोतीलाल ओसवाल यांचे म्हणणे आहे की, सरकारी सब्सिडियरीमध्ये वाढ झाली असली तरी, Coromandel Internationalच्या EDITDA मार्जिनवर दबाव राहील अशी आमची अपेक्षा आहे. कारण वस्तूंच्या किमतीतील वाढ भरून काढण्यासाठी सरकारच्या निर्देशांमुळे उद्योगांना पुरेशी वाढ करता आली नसून, उद्योगाच्या मूलभूत गोष्टी मात्र तेजीत राहिल्या आहेत. शेतकऱ्यांमध्ये पिकांसाठी संतुलित खतांच्या माहितीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल युरियापेक्षा इतर कॉम्लेक्स खतांकडे वळत असून, त्याचा फायदा Coromandel International सारख्या कंपन्यांना होणार आहे.

First published:

Tags: Investment, Money, Share market