नवी दिल्ली, 15 डिसेंबर : मागील दीड वर्षांपासून जागतिक अर्थव्यवस्था दबावाखाली असतानाही भारतीय शेअर बाजाराने नवा उच्चांक गाठला. या कालावधीत अनेक शेअर्सने मल्टीब्लॉगर शेअर्सच्या लिस्टमध्ये आपलं स्थान मिळवलं आहे. असाच जिंदाल पॉली इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स (Jindal Poly Investment & Finance) हा भारतीय शेअर बाजारातील मल्टीब्लॉगर शेअर्सपैकी एक आहे. 2021 मध्ये मल्टीब्लॉगर शेअर्सपैकी एक शेअर जवळपास 22 रुपयांवरुन 354 रुपयांपर्यंत पोहोचला. यावर्षी यात जवळपास 1500 टक्क्यांची वाढ झाली आहे.
एक महिना आधी 15 नोव्हेंबर 2021 रोजी हा मल्टीब्लॉगर स्टॉक NSE वर 289.20 रुपयांवर बंद झाला होता आणि 14 डिसेंबर 2021 रोजी हा स्टॉक 354 रुपयांवर बंद झाला. या काळात जवळपास 22 टक्क्यांची वाढ झाली. मागील 6 महिन्यात हा मल्टीब्लॉगर पेनी स्टॉक 37.20 रुपयांनी वाढून 354 वर पोहोचला, ही जवळपास 852 टक्क्यांची वाढ आहे.
त्याचप्रमाणे मागील वर्षीचा डेटा पाहिल्यास हा शेअर 22 रुपयांवरुन 354 रुपयांवर पोहोचला. त्यामुळे टक्कयांनुसार यात 1500 टक्क्यांहून अधिक रिटर्न मिळाले आहेत.
एका वर्षात 1 लाखाचे झाले 16 लाख -
या मल्टीब्लॉगर स्टॉकच्या शेअरची किंमत पाहिल्यास, जर एखाद्या गुंतवणुकदाराने एक महिना आधी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर त्याचे 1 लाखाचे आज 1.22 लाख रुपये झाले असतील.
जर एखाद्याने यात एक वर्षापूर्वी या मल्टीब्लॉगर पेनी स्टॉकमध्ये 1 लाखांची गुंतवणूक केली असेल, तर आज त्याच एक लाखाचे 16 लाख 8 हजार रुपये झाले असतील.
मागील एका वर्षात निफ्टीने 23.60 टक्के रिटर्न दिले आहेत आणि BSE सेन्सेक्सने 21.5 टक्क्यांच्या वाढीची नोंद केली आहे. तर Jindal Poly Investment & Finance ने या बेंचमार्क इंडेक्सेसच्या तुलनेत अनेक पटीने रिटर्न दिले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Share market