मुंबई, 14 जून : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात अनिश्चितता आहे. अनेक शेअरमध्ये मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. कमकुवत शेअर बाजार असूनही, राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) ज्यांना बिग बुल म्हटले जाते त्यांनी एका महिन्यात सुमारे 215 कोटी रुपये कमावले आहेत. मेट्रो ब्रँड्सचा स्टॉक (Metro Brands Share) गेल्या एका महिन्यात 515.05 रुपये ते 570.05 रुपयांपर्यंत वाढला आहे, ज्याने या कालावधीत 55 रुपये प्रति शेअर किंवा 10.7 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. मेट्रो ब्रँडच्या शेअरच्या किमतीत झालेल्या या वाढीमुळे राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांना या पोर्टफोलिओ (Rakesh Jhunjhunwal’s Portfolio) स्टॉकमधून सुमारे 215 कोटी रुपये कमावले आहेत. मेट्रो ब्रँड्समध्ये राकेश झुनझुनवाला यांची हिस्सेदारी जानेवारी ते मार्च 2022 या कालावधीसाठी मेट्रो ब्रँड्सच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांनी त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्यामार्फत या नव्याने लिस्टेड फुटवेअर स्टॉकमध्ये गुंतवणूक केली आहे. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे मेट्रो ब्रँड्समध्ये 3,91,53,600 शेअर्स आहेत, जे कंपनीच्या एकूण पेड-अप कॅपिटलच्या 14.43 टक्के आहे. ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या ग्राहकांना खूशखबर! फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ मेट्रो ब्रँड शेअर प्राईज हिस्ट्री राकेश झुनझुनवाला यांचा हा नव्याने लिस्ट झालेला स्टॉक बाजारातील कमकुवत सेंटिमेंट्स असूनही बुल्सच्या पसंतीस उतरला आहे. गेल्या एका महिन्यात 515.05 च्या पातळीवरून 570.05 रुपये प्रति शेअर पर्यंत वाढला आहे, यामध्ये प्रति शेअर 55 रुपयांची वाढ नोंदवली आहे. देशातील महागाई आणखी वाढणार नाही, SBI च्या रिपोर्टमध्ये दावा; रेपो दर आणखी वाढण्याची शक्यता राकेश झुनझुनवाला यांच्या संपत्तीत वाढ राकेश झुनझुनवाला यांच्याकडे मेट्रो ब्रँडचे 3,91,53,600 शेअर्स आहेत, जे गेल्या एका महिन्यात प्रति शेअर 55 रुपयांनी वाढले आहेत. तर, राकेश झुनझुनवाला यांनी गेल्या एका महिन्यात मेट्रो ब्रँड्सच्या शेअर्सच्या वाढीतून 215 कोटी (55 x 3,91,53,6000) कमावले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.