नवी दिल्ली, 22 जून : आपल्यापैकी अनेक लोकांनी ट्रेन आणि मेट्रो या दोन्हीमधून प्रवास केला असेल. या प्रवासादरम्यान अनेकांच्या हेही लक्षात आले असेल की, ट्रेनच्या प्रवासादरम्यान ट्रॅक आणि चाकांमध्ये सतत खट-खट आवाज येत असतो. एवढंच नाही तर संपूर्ण रस्त्यावर हलके हादरेही आपल्याला जाणवतात. पण, मेट्रोमध्ये प्रवास करताना असं काहीही होत नाही. हे असं का होतं याचा तुम्ही कधी विचार केलाय का? नाही ना… चला तर मग आज आपण त्याचं उत्तर जाणून घेणार आहोत.
ट्रेनच्या सतत खट-खट आवाज येण्यामागे एक इंट्रेस्टिंग कारण आहे. याचं मुख्य कारण म्हणजे मुख्य बिंदु रुळ आणि त्यांची बनावट हे आहे. भारतीय रेल्वेचे रुळ हजारो किलोमीटर पसरलेल्या आहेत हे आपल्याला माहीत आहे. अशा वेळी कारखान्यात हजार किलोमीटर लांबीचा ट्रॅक बनवून रुळावर टाकणे शक्य होत नाही, मग यावर उपाय काय? उपाय म्हणजे ट्रॅकचे छोटे तुकडे आणणे आणि त्यांना एकत्र जोडणे. ट्रॅकच्या तुकड्यांना जोडून एक लांब रेषा तयार केली जाते. हेच आवाजाचे कारण आहे. रुळ जोडल्यामुळे येतो आवाज भारतात, ट्रॅकच्या तुकड्याची लांबी 20 मीटर आहे. म्हणजेच हजारो किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग दर 20 मीटरला एक नवीन तुकडा जोडून तयार केला जातो. ज्या ठिकाणी ट्रॅक जोडला जातो तिथे थोडेसे अंतर सोडले जाते. असं करतात कारण हवामान बदलत असताना ट्रॅक लहान होतात किंवा पसरतात होतात. हा बदल फार मोठा नाही, पण असे दीर्घकाळ राहिल्यास ट्रॅक एकतर वाकडा होईल किंवा काही वेळाने तुटेल जाईल. म्हणूनच थोडेसे अंतर सोडले जाते जेणेकरून ट्रॅक पसरला असला तरी तो वाकडा होऊ नये. असं करुन ट्रेनला अपघातापासून वाचवलं जातं. Railway Facts: विजेवर चालणाऱ्या लोखंडाच्या ट्रेनमध्ये का उतरत नाही करंट? इंट्रेस्टिंग आहे कारण जेव्हा ट्रेन या गॅपवरुन जाते तेव्हा खट-खट आवाज येतो आणि त्यासोबत हलके हादरेही बसतात. दर 20 मीटरने ट्रॅक जोडला गेल्याने, आवाज आणि धक्के दोन्ही सतत चालू राहतात. मात्र, आता ट्रॅक जोडण्याच्या पद्धतीमध्ये बदल केला जात आहे. ते थेट एकमेकांसोबत जोडण्याऐवजी साइडने एकमेकांना जोडले जात आहेत. जेणेकरून ट्रेनच्या चाकांना अंतर ओलांडावे लागणार नाही आणि धक्का आणि आवाज कमी होईल. Indian Railway : ट्रेन लेट झालीये? मग प्लॅटफॉर्मवर किती वेळ थांबणार, 30-40 रुपयात मिळेल शानदार AC रुम मेट्रोचे ट्रॅक वेगळे का आहेत मेट्रोच्या ट्रॅकमध्येही जॉइंट असतात. मात्र मेट्रोसाठी टाकण्यात आलेल्या ट्रॅकचा जॉइंट काही अंतरावर टाकण्यात आलेला असतो. दुसरी गोष्ट म्हणजे मेट्रोच्या दोन स्टेशनमधील अंतर फक्त 1-2 किलोमीटर असतं. रुळांमधील अंतर आणि स्टेशन जवळ असल्यामुळे प्रवाशांना या धक्क्यांची लवकर जाणिव होत नाही. मात्र, डेपो वगैरेच्या आधी किंवा स्टेशनमधील अंतर जरा जास्त असेल तर कधी कधी मेट्रोमध्येही हलके धक्के जाणवू शकतात.