जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Indian Railway : ट्रेन लेट झालीये? मग प्लॅटफॉर्मवर किती वेळ थांबणार, 30-40 रुपयात मिळेल शानदार AC रुम

Indian Railway : ट्रेन लेट झालीये? मग प्लॅटफॉर्मवर किती वेळ थांबणार, 30-40 रुपयात मिळेल शानदार AC रुम

रेल्वे नॉलेज

रेल्वे नॉलेज

Indian Railway : रिटायरिंग रुमच्या सुविधेसाठी पैसे भरावे लागतात. पण हे चार्ज पाहता तुम्ही सहज ती रुम घेऊ शकता. ट्रेनच्या वेळेपूर्वी किंवा नंतर 12 ते 24 तासांसाठी ही रुम घेतली जाऊ शकते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 20 जून : प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेचे अनेक नियम आहेत. रेल्वे मार्फत प्रवाशांना विविध सुविधा पुरवल्या जातात. कधी रेल्वे प्रवाशांना विशेष गाड्यांची सुविधा पुरवते, तर कधी बर्थशी संबंधित सेवा पुरवते. पण तुम्हाला माहित आहे का की भारतीय रेल्वे आपल्या स्टेशनवर रिटायरिंग रूमची सुविधा देखील पुरवते. आम्ही तुम्हाला सांगतो की हे एक प्रकारचे हॉटेल आहे जिथे तुम्ही कमी खर्चात काही तास राहू शकता.

News18लोकमत
News18लोकमत

समजा तुमच्या ट्रेनला उशीर असेल किंवा तुमची ट्रेन वेळेपूर्वी पोहोचली असेल, तर तुम्ही IRCTC वेबसाइटला भेट देऊन PNR नंबरसह तुमची रुम बुक करू शकता. यानंतर तुम्ही इथल्या रुम्समध्ये आराम करु शकता. आज आम्ही तुम्हाला इथल्या रिटायरिंग रूमबद्दल आणि रेल्वेच्या या सुविधेबद्दल सविस्तर सांगणार आहोत. या सुविधेविषयी फार कमी लोकांना माहिती आहे आपल्या देशात ट्रेन लेट होणं ही सामान्य गोष्ट आहे. उदाहरणार्थ, हिवाळ्यात धुक्यामुळे, कधी कधी इतर कारणांमुळे ट्रेनला लेट होतं. अशा वेळी हजारो प्रवासी गाड्यांची वाट पाहत स्टेशनवर उभे राहून ट्रेनची वाट पाहत असतात. नंतर मग त्यांना कळतं की, गाडी दोन, चार किंवा सात तास उशिरा येणार आहे. असं समजल्यावर त्यांच्यापुढे प्लॅटफॉर्मवर थांबण्याशिवाय पर्याय नसतो. अशा वेळी इतके तास बाहेर थांबणे त्यांच्यासाठी कठीण होऊन बसते. ही समस्या लक्षात घेऊन रेल्वे स्टेशनवर रिटायरिंग रूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. Railway News: अनोखी आहे देशातील ही सर्वात छोटी रेल्वे यात्रा! 9 मिनिटात संपतो प्रवास रिटायरिंग रूमची फॅसिलिटी काय आहे? रिटायरिंग रूमची सुविधा चार्जेबल आहे. पण हे चार्जेस तुमच्या खिशाला परवडणारे आहेत. यामुळे तुम्ही येथे सहज खोली घेऊ शकता. ते ट्रेनच्या वेळेच्या 12 ते 24 तास आधी किंवा नंतर घेतले जाऊ शकते. म्हणजेच, जर तुम्हाला खोलीची आवश्यकता असेल तर तुम्ही ती 12 तासांसाठी किंवा संपूर्ण दिवसासाठी घेऊ शकता. ज्यामध्ये तुम्ही तिकिटाच्या पीएनआर नंबरसह साइटला भेट देऊन ते बुक करू शकता. एसी आणि नॉन एसी दोन्ही खोल्या आहेत प्रमुख स्टेशनवर तुम्हाला दोन प्रकारच्या रेल्वे रिटायरिंग रूम्स मिळतील. यामध्ये एसी आणि नॉन एसी दोन्ही रुमचा समावेश आहे. यासोबतच इंटरनेटच्या मदतीने, तुम्ही रिटायरिंग रूमची अडव्हान्स बुकिंग देखील करू शकता. परंतु तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की ज्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म झाले आहे किंवा ज्यांचे आरएसी आहे त्यांनाच रिटायरिंग रूमची सुविधा मिळेल. वेटिंग तिकीट, कार्ड तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट असणाऱ्यांना रिटायरिंग रूमची सुविधा दिली जात नाही. मात्र, जर तुमच्याकडे 500 किमी अंतराचे जनरल तिकीट असेल, तर तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. Railway knowledge: इमर्जेन्सीत विना तिकीट ट्रेनमध्ये प्रवास करता येतो का? काय सांगतो रेल्वेचा नियम? प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या नियमावर असते बुकिंग रेल्वेची ही रियाटरिंग रुम फॅसिलिटी फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह या या नियमावर काम करते. रुम पूर्ण भरल्या गेल्यास, तुम्हाला प्रतीक्षा यादीत टाकले जाईल आणि जर कोणी खोली रद्द केली तर तुम्हाला अपडेट मिळेल. बुकिंगसाठी तुम्हाला तुमचा पीएनआर नंबर द्यावा लागेल. यासोबतच फोटो, आयडी कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड आणि क्रेडिट कार्ड ही कागदपत्रेही दाखवावी लागतील. लोकांना या रेल्वे सेवेबद्दल फारशी माहिती नाही कारण ती अद्याप बहुतेक स्टेशनवर उपलब्ध नाही. अशा वेळी, तुम्हाला दिल्ली, मुंबई आणि चेन्नईसारख्या प्रमुख स्टेशनवर रिटायरिंग रूमची सुविधा मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात