Railway Knowledge: लांबच्या प्रवासासाठी रेल्वे ने प्रवास करणे हे सर्वात स्वस्त आणि सुलभ आहे. भारतात अशा काही गाड्या आहेत ज्या एकाच वेळी 3000 किलोमीटरचा प्रवास करतात. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 70 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. यामध्ये हिमसागर एक्स्प्रेस आणि विवेक एक्सप्रेसची नावं तुम्ही ऐकली असतील. पण तुम्हाला माहित आहे का भारतातील सर्वात लहान रेल्वे मार्ग कोणता आहे, जिथे ट्रेन फक्त 3 किलोमीटर धावते. रेल्वेचा प्रवास फक्त 3 किलोमीटरचा आहे हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. कारण ट्रेनला वेग पकडण्यासाठीच एवढा वेळ लागतो. पण हे खरे आहे की भारतीय रेल्वेच्या सर्वात लहान मार्गाची एकूण लांबी फक्त 3 किलोमीटर आहे. हा रेल्वे मार्ग कुठे आहे आणि त्यावर कोणत्या गाड्या धावतात आणि या छोट्या प्रवासासाठी किती भाडे मोजावे लागते ते जाणून घेऊया.
देशातील सर्वात लहान रेल्वे मार्ग कुठेय?
भारतातील सर्वात लहान रेल्वे मार्ग महाराष्ट्रात आहे. जेथे नागपूर आणि अजनी दरम्यानचे एकूण अंतर 3 किमी आहे. या मार्गावर सुमारे 4-5 गाड्या धावतात. विशेष म्हणजे येथे मोठ्या संख्येने लोक 3 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी ट्रेन पकडतात. या मार्गावर निवडक ट्रेन धावतात. यामध्ये विदर्भ एक्सप्रेस (12106), नागपूर-पुणे गरीब रथ (12114), नागपूर-पुणे एक्सप्रेस (12136) आणि सेवाग्राम एक्सप्रेस (12140) यांचा समावेश आहे.
Railways Facts : पॅसेंजर ट्रेनमध्ये का लावले जात नाहीत 24 पेक्षा जास्त कोच, नेमकं कारण काय?ट्रेनचे भाडे आणि प्रवासाची वेळ
नागपूर ते अजनी हे अंतर फक्त 3 किलोमीटर आहे. प्रत्येक ट्रेनला प्रवास पूर्ण करण्यासाठी 8-9 मिनिटे लागतात. भाड्याबद्दल बोलायचे झाल्यास, IRCTC च्या तिकीट बुकिंग साइटनुसार, स्लीपर-145, थर्ड एसी- 505 आणि सेकंड एसीचे भाडे 710 रुपये आहे. मात्र, ट्रेनच्या प्रकारानुसार या भाड्यात थोडा फरक आहे. अजनी रेल्वे स्टेशनवर गाड्यांचा थांबा सुमारे 1 ते 2 मिनिटे आहे. नागपुरात राहणारे रहिवासी या मार्गावरून दररोज प्रवास करतात.