जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Railways Facts : पॅसेंजर ट्रेनमध्ये का लावले जात नाहीत 24 पेक्षा जास्त कोच, नेमकं कारण काय?

Railways Facts : पॅसेंजर ट्रेनमध्ये का लावले जात नाहीत 24 पेक्षा जास्त कोच, नेमकं कारण काय?

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Railways Facts : ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी असतानाही रेल्वे जास्तीत जास्त 24 डब्यांसह का प्रवास करते हे तुम्हाला माहिती आहे का? याचे उत्तर जाणून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

Railway Interesting Facts: देशभरात रेल्वेचे मोठे जाळे आहे. भारतातील जास्तीत जास्त लोक हे रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात. प्रवाशांना रेल्वेने प्रवास करणं सुरक्षित, सोयीचं आणि परवडणारं वाटतं. रेल्वे देखील आपल्या पॅसेंजर्सची सुविधा लक्षात घेऊन वेळोवेळी आपल्या पद्धतींमध्ये बदल करत राहते. कोणत्याही पॅसेंजर ट्रेनमध्ये 24 पेक्षा जास्त डब्बे का नसतात हे तुम्ही कधी नोटीस केलंय का? कोणतीही पॅसेंजर ट्रेन कमीतकमी 3 डब्यांसह प्रवास सुरू करते. परंतु तिला 24 पेक्षा जास्त डबे लावले जात नाही. बरेच लोक याचा संबंध इंजिनच्या क्षमतेशी जोडतात मात्र असं अजिबात नाही. चला जाणून घेऊया यामागचे खरे कारण काय आहे?

News18लोकमत
News18लोकमत

त्यामुळे पॅसेंजर ट्रेनमध्ये 24 पेक्षा जास्त डबे नसतात

पॅसेंजर ट्रेनमध्ये 24 पेक्षा जास्त डबे नसण्याचं कारण खूप साधं आहे. मात्र त्याकडे कुणीच लक्ष देत नाही. तुमच्या कधी लक्षात आले असेल की, ज्यावेळी एका रुळावर दोन गाड्या समोरासमोर येतात, तेव्हा त्यातील एकाला काही वेळ दुसऱ्या ट्रॅकवर उभे करून दुसऱ्या ट्रेनला रस्ता दिला जातो. खरंतर, ही ट्रेन ज्या ट्रॅकवर उभी आहे त्याला लूप लाइन म्हणतात आणि यामुळेच पॅसेंजर ट्रेनमध्ये 24 पेक्षा जास्त डबे नसतात.

IRCTC Tour Package: हरिद्वारसह माता वैष्णो देवीच्या दर्शनाची संधी, फक्त 13 हजारांत 8 दिवसांचा टूर!

लूप लाइनचा आणि 24 डब्ब्यांचा काय संबंध?

रेल्वेच्या ज्या ट्रॅकवर ट्रेन येते आणि जाते त्याला मेन लाइन म्हणतात. आणि मध्यभागी कुठेतरी समोरच्या ट्रेनला रस्ता देण्यासाठी लूप लाइन असते. रेल्वेच्या नियमांनुसार कोणतीही लूप लाईन 650 ते 750 मीटर लांब असते. अशा वेळी कोणतीही प्रवासी गाडी लूप लाइनमध्ये जाण्यासाठी यापेक्षा जास्त लांब नसावी. कारण ट्रेनच्या एका डब्याची लांबी सुमारे 25 मीटर असते. अशा प्रकारे 24 डब्यांची लांबी सुमारे 650 मीटर होते. म्हणूनच यापेक्षा जास्त लांबीची ट्रेन लूप लाईनमध्ये उभी करता येत नाही.

IRCTC Tour Package: आयआरसीटीसीचं खास केरळ टूर पॅकज, 8 दिवसांची ट्रिप एकदम स्वस्तात!

40-50 डबे असलेली मालगाडी रस्ता कसा देते?

रेल्वे रुळावरून धावणाऱ्या गाड्यांना त्यांच्या प्रायोरिटीनुसार मार्ग देण्यात येतो. एखाद्या एक्स्प्रेस किंवा नॉन-स्टॉप ट्रेनला आपल्या गंतव्यस्थानावर लवकर पोहोचावे लागते. अशा वेळी ज्या काही लोकल गाड्या किंवा मालगाड्या रुळावर असतात, त्या लूप लाइनवर ट्रांसफर केल्या जातात. कारण माल गाड्यांच्या डब्यांची लांबी ही पॅसेंजर गाड्यांपेक्षा कमी असते. मालगाड्यांमधील बहुतेक डबे 11 ते 15 मीटर लांबीचे असतात. त्यामुळे 40 डबे असलेली मालगाडीदेखील लूप लाइनवर सहज उभी करता येते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात