जाहिरात
मराठी बातम्या / मनी / खिशात प्लॅटफॉर्मचं तिकीट असुनही लागेल पेनल्टी, बचावासाठी जाणून घ्या हा कायदा

खिशात प्लॅटफॉर्मचं तिकीट असुनही लागेल पेनल्टी, बचावासाठी जाणून घ्या हा कायदा

रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट नियम

रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट नियम

रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रेल्वे तिकीट किंवा प्लॅटफॉर्म तिकीट असणं आवश्यक असतं. प्रवासाचे तिकीट किंवा रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट नसल्यामुळे प्रवाशाला दंड भरावा लागतो. कारण प्लॅटफॉर्म तिकिट फक्त काही तासांसाठी वैध असतं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 मे: ज्यांना रेल्वेने प्रवास करायचा नाही अशा अनेक लोकांनाही रेल्वे प्लॅटफॉर्मवर जावं लागतं. तुम्ही सुद्धा कधी ना कधी रेल्वे प्लॅटफॉर्मवर ट्रेनमध्ये चढण्यासाठी किंवा एखाद्या ओळखीच्या किंवा नातेवाईकाला घेण्यासाठी गेला असाल. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट काढणं अनिवार्य नसतं. रेल्वे नियम सांगतात की, ज्याच्यांकडे रेल्वे प्रवासाचे वैध तिकीट आहे किंवा रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट आहे तेच लोक रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाऊ शकतात. प्रवासाचे तिकीट किंवा रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट नसल्यामुळे प्रवाशाला दंड भरावा लागतो. पण, तुम्हाला माहीत आहे का की, प्लॅटफॉर्म तिकिटाचीही वैधता असते? हे तिकीट एकदा खरेदी करून तुम्ही दिवसभर रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबू शकत नाही.

News18लोकमत
News18लोकमत

म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी कराल तेव्हा चेक करा की, ते फक्त दोन तासांसाठी वैध असतं. तुम्ही दोन तासांपेक्षा जुने प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन रेल्वे स्टेशनवर पकडले गेल्यास, तुम्हाला दंड भरावा लागतो. रेल्वेच्या वेबसाईट erail.in नुसार, 10 रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन कोणतीही व्यक्ती दिवसभर प्लॅटफॉर्मवर थांबू शकत नाही. एकदा हे तिकीट खरेदी केल्यानंतर प्लॅटफॉर्मवर फक्त दोन तासच थांबता येईल.

250 रुपये दंड

जर प्रवासी प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करायला विसरला तर रेल्वे तिकीट तपासणारे कर्मचारी किमान 250 रुपये दंड आकारू शकतात. एवढंच नाही तर प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्म तिकीट किंवा प्रवासाचे तिकीट नसताना प्रवासी पकडले गेल्यास प्लॅटफॉर्मवरून निघालेल्या आधीच्या ट्रेनच्या किंवा ज्या प्लॅटफॉर्मवर प्रवासी पकडला आहे त्या प्लॅटफॉर्मवर आलेल्या ट्रेनच्या दुप्पट भाडे आकारले जाईल. अशी तरतूद केलेली आहे.

IRCTC Tour Package: फक्त 6 हजार रुपयांत करा वाराणसीची सैर, 4 दिवसांचं स्वस्त टूर पॅकेज

रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटाबद्दल तुम्हाला आणखी एक गोष्ट माहित असावी. रेल्वे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक परिस्थितीत प्लॅटफॉर्म तिकीट देण्यास बांधील नाही. प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या जागेनुसारच प्लॅटफॉर्म तिकीट दिले जाते. याचा अर्थ प्लॅटफॉर्मच्या क्षमतेपेक्षा जास्त लोकांना प्लॅटफॉर्म तिकीट दिले जात नाहीत. जर क्षमतेनुसार प्लॅटफॉर्म तिकीट आधीच जारी केले गेले असेल, तर त्यानंतर प्लॅटफॉर्म तिकीट मागणाऱ्या व्यक्तीला रेल्वे हे तिकीट देण्यास नकार देऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात