नवी दिल्ली, 11 जून : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC पर्यटन स्थळे तसेच धार्मिक स्थळांसाठी टूर पॅकेज ऑफर करते. नुकतंच IRCTC ने 'वैष्णो देवी हरिद्वार भारत गौरव स्पेशल टूर' नावाचे पॅकेज सादर केलं आहे.
या टूर पॅकेज अंतर्गत प्रवाशांना भारत गौरव टुरिस्ट ट्रेनमधून वैष्णोदेवी आणि हरिद्वारची सैर करायला मिळणार आहे.
IRCTC ने ट्विटद्वारे या पॅकेजची माहिती दिली आहे. हे पॅकेज कोलकाता येथून सुरू होणार आहे. हा प्रवास भारत गौरव स्पेशल टुरिस्ट ट्रेनमधून होईल. हा टूर 25 जून 2023 पासून सुरू होतोय.
या पॅकेजमध्ये तुम्हाला खाण्यापिण्याची चिंता करण्याची गरज नाही. IRCTC कडून प्रवाशांसाठी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली जाईल.
टूर पॅकेजची फिस कॅटेगिरीनुसार वेगवेगळी असेल. पॅकेज 13,680 रुपये प्रति व्यक्ती पासून सुरू होईल. इकॉनॉमी क्लाससाठी तुम्हाला 13,680 रुपये द्यावे लागतील. स्टँडर्ड कॅटेगिरीसाठी प्रति व्यक्ती 21,890 रुपये आकारावे लागतील तर कंफर्ट कॅटेगिरीसाठी प्रति व्यक्ती 23,990 रुपये खर्च करावे लागतील.