नवी दिल्ली, 25 जुलै : ट्रेनमधून दररोज कोट्यवधी लोक प्रवास करतात. मात्र या लोकांसाठी मंगळवारी सकाळीच मोठी समस्या उभी राहिली आहे. कारण IRCTC च्या साइटवरुन तिकीटं बुक करण्यात अडचणी येत आहेत. लाखो लोक हे IRCTC वरुन तिकीट बुक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण अनेक प्रयत्न करुनही तिकीट बुक होत नाहीये. अनेक प्रवाशांचे तर पैसेही कट झाले आहेत पण तिकीट काढता येत नाहीये. यानंतर सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पडतोय. यानंतर रेल्वेने या तांत्रिक बिघाडाचं कारण सांगितलं आहे. यासोबतच तिकीट बुक करण्याचं दुसरं जुगाडही सांगितलं आहे.
सकाळपासूनच ट्विटरवर मोठ्या संख्येने लोकांनी आयआरसीटीसी आणि रेल्वेला टॅग केले आणि तिकीट बुक न झाल्याची तक्रार दाखल केली. याला उत्तर देताना रेल्वेने सांगितले की, काही तांत्रिक बिघाडामुळे तिकीट बुक करण्यात अडचण येत आहे. लवकरच ही समस्या दूर होईल. तोपर्यंत प्रवासी दिशा चॅटबॉटद्वारे तिकीट बुक करू शकतात. विशेष म्हणजे IRCTC वेबसाइटवर दिशा चॅटबॉटचा ऑप्शन देखील उपलब्ध आहे, जिथे प्रवाशांना त्यांच्या कोणत्याही समस्येवर समाधान मिळू शकतं. IRCTC ने आणलंय श्रीलंकाचं खास टूर पॅकेज! पाहा रामायणासंबंधित खास ठिकाणं एसी क्लाससाठी तत्काळ तिकिटांचे बुकिंग सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होते. अशा वेळी ज्या प्रवाशांना तत्काळ बुकिंगद्वारे तिकीट बुक करून आपला प्रवास पूर्ण करायचा आहे. त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याच वेळी, स्लीपर क्लाससाठी तत्काळ तिकिटांचे बुकिंग सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होते. आजपर्यंत ही तांत्रिक अडचण दूर झाली नाही, तर त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. IRCTC Update: टूरिस्ट प्लेसपासून सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन कोणतं? IRCTC वेबसाइटवर असं करा चेक IRCTC च्या विनंतीनुसार, वेबसाइटवर तिकीट बुक करण्यासाठी लॉग इन करण्याचा प्रयत्न करताना, ती Error दर्शवत आहे. परंतु Ask Disha वर तिकीट बुक करणे शक्य आहे. तुम्ही IRCTC वेबसाइटवर लॉग इन करण्याचा प्रयत्न करताच. लगेच Ask Disha ची विंडो उघडली जात आहे. जिथे तिकीट बुक करण्याचा ऑप्शन दिसतो. येथून तुम्ही तिकीटं बुक करु शकता.