नवी दिल्ली, 23 जुलै : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी IRCTC वेबसाइट आणि मोबाइल अॅपमध्ये नवीन फीचर्स जोडले आहेत. या फीचर्सच्या मदतीने यूझर्स पर्यटन स्थळांच्या जवळट्या स्टेशनविषयी सहज माहिती मिळवू शकतील. यासोबतच योग्य स्थानांची निवड करण्यातही आता वेबसाइट प्रवाशांना मदत करेल. या अपडेशनसह IRCTC ने तिकीट बुकिंग प्रोसेसही सोपी केली आहे. भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी वेळोवेळी IRCTC वेबसाइट आणि मोबाईल अॅप नवनवीन फीचर्स अपडेट करत राहतात. आता त्यात आणखी काही सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. रेल्वेने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
रेल्वेने ट्विट करून दिली माहिती IRCTC वेबसाइट आणि मोबाईल अॅपमधील अपडेटबाबत रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. या ट्विटच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘फक्त स्टेशनच नाही, तर रेल्वेही योग्य ठिकाणही सांगेल. भारतीय रेल्वेच्या IRCTC वेबसाइट/मोबाइल अॅपची नवीन सुविधा पर्यटन स्थळांच्या सर्वात जवळ असलेल्या स्टेशनची माहिती देतील आणि तिकीट बुकिंग सुलभ करेल. यासोबतच ते प्रवाशांना योग्य जागा निवडण्यात मदत करतील.’ IRCTC ने आणलंय खास दिव्य दक्षिण यात्रा टूर पॅकेज! कमी पैशांत होईल देवदर्शन टूरिस्ट प्लेस कसं शोधायचं? आता IRCTC वेबसाइट किंवा मोबाईल अॅपच्या मदतीने तुम्ही कोणत्याही पर्यटन स्थळाजवळील रेल्वे स्टेशन सहज शोधू शकता. यासाठी वेबसाईट आणि मोबाईल अॅपवर काही नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत. तसेच देशभरातील रेल्वे स्टेशन आणि त्यांच्या आजूबाजूला असलेल्या पर्यटन स्थळांची माहितीही देण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना प्रवास करताना अधिक सुविधा मिळणार आहेत. Indian Railway: बदलेल पॅसेंजर ट्रेनचं रुप! प्रत्येक कोचमध्ये असेल AC,पाहा कधी मिळेल ही सुविधा रेल्वेने या सुविधा वाढवल्या रेल्वेने नुकतेच जनरल बोगीतून प्रवास करणाऱ्या लोकांसाठी डब्यासमोर इकॉनॉमी मील स्टॉल उभारण्याची घोषणा केली होती. रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या आदेशानुसार, जेवण आणि परवडणारे बाटलीबंद पाणी उपलब्ध करून देणारे हे काउंटर ज्या प्लॅटफॉर्मवर जनरल डबे थांबतात तेथे बसवले जातील. त्याची विविध श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये 20 रुपये किमतीच्या सात पुऱ्या, सुकी बटाट्याची भाजी व लोणचं दिलं जाणार आहेत. त्याचबरोबर भात, राजमा, छोले, खिचडी कुलचे, भटुरे, पावभाजी आणि मसाला डोसा असे दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ 50 रुपयांना दिले जातील.