नवी दिल्ली, 9 जुलै : 6 इंजिनची ट्रेन असते असं म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. तुम्ही म्हणाल की, अशी काय ट्रेन असते का? तसंच तुम्हाला प्रश्न पडले की, सहा इंजिनची ट्रेन अखेर किती डब्यांना ओढत असेल. मात्र ट्रेनने हजारो, लाखो लोक दररोज प्रवास करतात. ज्यामुळे ट्रेनची लांब तशीही खूप मोठी असते. पण काही ट्रेन अशा असतात, ज्यांना ओढण्यासाठी अनेक इंजिनची गरज असते. भारतातील सर्वात लांब ट्रेन कोणती असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आज आपण याविषयी जाणून घेऊया.
तुम्ही अनेकदा वेगवेगळ्या ट्रेनमधून प्रवास केला असेल. खरंतर, भारतीय लोकांना एका शहरातून दुसऱ्या शहरात आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी ट्रेन हा सर्वात स्वस्त आणि उत्तम मार्ग वाटतो. ट्रेनमधील प्रत्येक वर्ग लक्षात घेऊन डबे ठरवले जातात. भारतात एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जाण्यासाठी ट्रेनपेक्षा चांगलं काहीच नसेल. ही आहे भारतातील सर्वात लांब ट्रेन या ट्रेनबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. सुपर वासुकी ट्रेन ही भारतातील सर्वात लांब ट्रेन म्हणून ओळखली जाते. या ट्रेनची रंजक गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त ही ट्रेन सुरू करण्यात आली. या ट्रेनला 20 किंवा 30 डबे नसून 295 डबे आहेत. ज्यांना सोबत घेऊन ही ट्रेन चालते. आश्चर्याची बाब म्हणजे ही ट्रेन सुमारे 3.5 किलोमीटर लांब आहे. हे डब्बे मोजायला बसले तर किमान एक तास लागेल. Indian Railway च्या टॉप 10 ट्रेन! प्रवासासाठी आहेत बेस्ट, जेवणासह सर्वच सुविधेत एक नंबर मालगाडी आहे सुपर वासुकी भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी सर्वात लांब मालगाडी म्हणजे सुपर वासुकी आहे. ही ट्रेन छत्तीसगड ते कोरबा येथून रवाना होते आणि नागपूरच्या राजनंदगावपर्यंत चालते. या प्रवासासाठी ट्रेनला जवलपास 11.20 तासांचा वेळ लागतो. IRCTC Tour Package: 15 हजार रुपयात चार दिवस गुजरात फिरण्याची संधी! जाणून घ्या पॅकेज डिटेल्स सध्याच्या गाड्यांच्या तुलनेत क्षमता तिप्पट आहे सुपर वासुकीला मालगाडीचे स्वरूप देण्यासाठी पाच मालगाड्यांचे रेक एकत्र जोडले गेले आहेत. या ट्रेनद्वारे वाहून नेलेला एकूण कोळसा संपूर्ण दिवसासाठी 3,000 मेगावॅट पॉवर प्लांटला आग लावण्यासाठी पुरेसा आहे, जो सध्याच्या ट्रेनच्या क्षमतेपेक्षा तिप्पट आहे. ही ट्रेन एका प्रवासात जवळपास 9,000 टन कोळसा घेऊन जाते.