मुंबई, 24 जून : तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात? मग तुमचं वाट पाहणं आता संपलं. कारण भारतीय रेल्वेनं अनेक पदांवर भरती सुरू केलीय. सेंट्रल रेल्वेमध्ये एकूण 2150 पदांवर भरती केली जातेय. त्यात ज्युनियर इंजीनियर, कमर्शियल क्लर्क, पाॅइंटमॅन, सीनियर सेक्शन इंजीनियर अशा अनेक पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करावेत. या पदांसाठी मुंबई सेंट्रल रेल्वेत काम केलेले माजी कर्मचारीही अर्ज करू शकतात. पण यांना फक्त महिन्याचा पगार मिळेल. त्यांना पेन्शन, अंतिम वेतन, सीएल, पीएल या सुट्ट्या मिळणार नाहीत. उमेदवारांची निवड लिखित परीक्षा आणि इंटरव्ह्यूच्या आधारे केली जाईल. या पदांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै आहे. कचोऱ्या विकणारा निघाला करोडपती! वार्षिक कमाई पाहून तुम्ही व्हाल थक्क पदं आणि संख्या ज्युनियर इंजीनियर- 86 कमर्शियल क्लर्क- 72 पाॅइंटमॅन- 385 PPF, NSC,सुकन्या योजनांबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय लॅब अटेंडेंट- 9 सीनियर सेक्शन इंजीनियर- 11 ट्रॅक मेंटेनर – 109 टेक्निशियन - 8 याशिवाय सेंट्रल रेल्वेनं सीनियर सेक्शन ऑफिसर आणि इतर पदांसाठी अर्ज मागवलेत. इच्छुक आणि योग्य उमेदवारानं 28 जून 2019पर्यंत अर्ज करावेत, असं सांगण्यात आलंय. भारतात 1.1 कोटी महिलांची नोकरी धोक्यात, जाणून घ्या कारणं पोस्ट - सीनियर सेक्शन ऑफिसर आणि इतर 10 पदं या पदासाठी फक्त अकाउंट डिपार्टमेंटचे निवृत्त रेल्वे कर्मचारी अर्ज करू शकतात. याशिवाय री अॅरेंजमेंटमध्ये ज्याचं वय 65 वर्षापर्यंत आहे, ते या पदासाठी अर्ज करू शकतात. तसंच रेल्वेनं ट्रेड अप्रेंटिसच्या 432 पदांवर भरती सुरू केलीय. यात स्टेनोग्राफर, फिटर, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, मेकॅनिक, प्लंबर आणि पेंटर अशी अनेक पदं आहेत. 15 जुलै 2019पर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. apprenticeship.gov.in वर जाऊन लाॅग इन करू शकता. VIDEO : ‘ज्ञानबा तुकाराम’च्या गजरात तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







