Elec-widget

PPF, NSC,सुकन्या योजनांबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय, सर्वसामान्यांवर होईल परिणाम

PPF, NSC,सुकन्या योजनांबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय, सर्वसामान्यांवर होईल परिणाम

PPF, NSC,Sukanya Samruddhi Yojana - एनएससी, पीपीएफ यावर आता मोठा निर्णय होऊ शकतो.

  • Share this:

मुंबई, 24 जून : एनएससी, पीपीएफ यावर आता मोठा निर्णय होऊ शकतो. मोदी सरकार NSC आणि PPF सहित छोट्या बचत योजनांच्या व्याज दरात कपात करण्याचा निर्णय घेऊ शकते. CNBC आवाजच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार व्याज दर 0.30 टक्के कमी होऊ शकतात. ही कपात जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी लागू होईल. सरकारनं उचललेल्या पावलांनंतर बँकांवर आपल्या डिपाॅझिटवर व्याज दर कमी करण्यासाठी दबाव वाढेल. सरकार स्माॅल सेव्हिंग्ज स्कीमवर दर तिमाही व्याज दर ठरवतं. त्यात बदल करायचा की नाही हे सरकारवर अवलंबून आहे.

छोट्या बचत योजनांवर आताचा व्याज दर

पब्लिक प्राॅविडंट फंड (PPF) - 8%

सुकन्या समृद्धी योजना - 8.5%

वरिष्ठ नागरिक बचत योजना - 8.7%

Loading...

भारतात 1.1 कोटी महिलांची नोकरी धोक्यात, जाणून घ्या कारणं

राष्ट्रीय बचत पत्र - 8%

किसान विकास पत्र - 7.7%

पैसे कमवले आणि खर्च केले, पण या 5 गोष्टी केल्यात का?

CNBC आवाजला मिळालेल्या माहितीनुसार आताच्या आर्थिक वर्षातल्या दुसऱ्या तिमाहीत जुलै ते सप्टेंबरसाठी PPF, NSC, KVP यांच्या व्याज दरात कपात होऊ शकते. याआधी सप्टेंबर 2018मध्ये सर्वात जास्त व्याज दर वाढले होते. छोट्या बचत योजनांवरच्या व्याज दरांचा अभ्यास केला जातो. गेल्या वर्षी सरकारनं तिसऱ्या तिमाहीसाठी व्याज दर वाढवण्याची घोषणा केली होती.

मोदी सरकारच्या मदतीनं 'अशी' करा दर महिन्याला 30 हजार रुपये कमाई

पब्लिक प्राॅव्हिडंट फंड म्हणजेच PPF ही केंद्र सरकार चालवत असलेली योजना आहे. तुम्ही त्यात तुमच्या इच्छेप्रमाणे पैसे गुंतवू शकता. ते काही अनिवार्य नाही. ते ऐच्छिक आहे. तुम्ही कुठल्याही राष्ट्रीय बँकेत किंवा पोस्टात PPF अकाऊंट उघडू शकता. यासाठी तुम्हाला कुठल्या कंपनीचे कर्मचारी असणं गरजेचं नाही. PPFचा व्याज दर प्रत्येक तीन महिन्यांनी नक्की होतो. 1 एप्रिल 2019 ते 30 जून 2019पर्यंत पीपीएफ खात्यात 8 टक्के व्याज मिळेल.

...आणि संभाजीराजेंना अश्रू अनावर झाले, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: nscPPF
First Published: Jun 24, 2019 04:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...